लहान मुलांच्या नाक-कानात एखादा चुकून पदार्थ अडकला, पालकांनी काय करावे अन् काय करू नये?
लहान मुलांच्या नाक-कानात एखादा चुकून पदार्थ अडकल्यास तर पालकांनी काय करावे अन् काय करून नये? जाणून घ्या.

लहान मुलं घरात खेळताना छोटे मोठे अपघात होत असता. सूर्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणलेल्या तीन मुलांसोबत असाच प्रकार घडला. त्यावेळी काय करावे, करू नये हे लक्षपूर्वक जाणून घेतले पाहिजे. खरंतर या घटना घडल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. जेणेकरून लहान मुलांना त्रासातून वाचवता येऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण माहिती
अन् तीन वर्षांच्या मुलाच्या नाकात शेंगदाणा अडकला
एका तीन वर्षांच्या मुलाच्या नाकात खेळताना चुकून शेंगदाणा अकडला. काही वेळानंतर त्याला नाकात शेंगदाणा अडकल्याची जाणवलं. त्यानंतर त्याला अस्वस्थता जाणवली. त्याच्या नाकपुडीतून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पालकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं. येथील डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासणी करत शेंगदाणा सुरक्षितपणे बाहेर काढलाय मुलाच्या श्वसन आणि जखमेवर लक्ष ठेवले. यामुळे मुलगा स्थिर अवस्थेत घरी जाऊ शकले.
पालकांनी काय लक्षात ठेवावे?
मुलाच्या नाक किंवा कान अडकलेला पदार्थ घरीच जोरात काढण्याचा प्रयत्न काढणे टाळावे. तुमच्या बलप्रयोगाने नाकातील शेंगदाणा आणखी खोलवर जाऊ शकतो. तसेच श्वसनमार्गात जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास, रक्तस्त्राव किंवा सतत अस्वस्थता असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
दारात अडकले पाच वर्षांच्या मुलाचे बोट
दार बंद करताना पाच वर्षांच्या मुलाचे बोट अडकले. यामुळे मुलाच्या बोटाला तीव्र वेदना आणि सूज आली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी बोटाचे हाड तुटले आहे का, मऊ ऊतींना इजा झाली आहे का आणि रक्ताभिसरण व्यवस्थित आहे का ,हे सर्व तपासले. त्यानंतर त्यावर योग्य उपचार करत मुलाला घरी पाठवले. त्यानंतर पुढील निरीक्षणाबाबत सल्ला देण्यात आलाय.
पालकांनी काय लक्षात ठेवावे?
दारात अडकलेल्या बोटांच्या जखमा बाहेरून साध्या दिसत असल्या. तरी कधीकधी हाड तुटणे, नखांखालील इजा किंवा बोटांच्या टोकांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे तीव्र वेदना, सूज, विकृती, रक्तस्त्राव किंवा बोट हलवता न येणे असेल तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
चार वर्षांच्या मुलाने नाणी गिळलं
चार वर्षांच्या मुलाने चुकून एक नाणे गिळले. पालकांनी घरी उलटी करायला भाग पाडण्याचा प्रयत्न न करता थेट रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मुलाची तपासणी केली आणि इमेजिंगच्या मदतीने नाण्याचे स्थान निश्चित केले. त्यानंतर मुलाच्या स्थितीनुसार पुढील पावले उचलण्यापूर्वी निरीक्षण ठेवले.
पालकांनी काय करावे?
गिळलेल्या वस्तूंच्या बाबतीत जोखीम वस्तू कोणती आहे आणि ती कुठे आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे वैद्यकीय मूल्यांकन गरजेचे आहे. श्वास घेण्यास त्रास, गुदमरणे, जास्त लाळ येणे, सतत उलटी किंवा तीव्र वेदना झाल्यास तातडीने आपत्कालीन मदत घ्या.
पालकांसाठी महत्त्वाचा संदेश काय?
या तिन्ही घटनांमध्ये अपघात सेकंदात झाला, पण योग्य पावले उचलल्याने मोठा फरक पडल्याचे दिसून आले. पहिल्या घटनेत घरी जोरात काढण्याचा घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करू नका. तसेचघाबरू नका, पण लक्षणे ओळखून वेळेवर मदत घ्या. श्वास घेण्यास त्रास, रक्तस्त्राव, विकृती, तीव्र वेदना किंवा सतत अस्वस्थता ही आपत्कालीन लक्षणे आहेत. लहान मुलांसोबत अपघात कधीही होऊ शकतात. पण तयार राहत योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणे हीच सर्वात मोठी तयारी आहे.
