AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 कोटींचे बाजूबंद अन् 400 कोटींचा हार, अंबानी कुटुंबातील दागिन्यांची किंमत पाहून व्हाल थक्क!

अंबानी कुटुंबाकडे अनेक मौल्यवान दागिने आहेत. या दागिन्यांची चर्चा जगभरात होते. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबीयांचे हे दागिने अनेक कार्यक्रमात त्यांच्या अंगावर दिसले आहेत.

200 कोटींचे बाजूबंद अन् 400 कोटींचा हार, अंबानी कुटुंबातील दागिन्यांची किंमत पाहून व्हाल थक्क!
ambani family jewellery
| Updated on: Jun 07, 2025 | 5:16 PM
Share

Nita Ambani Isha Ambani Jewellery : भारताचे अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अख्खं जग ओळखतं. त्यांनी भारत तसेच इतर देशांतही उभारलेलं उद्योगांचं जाळं हे डोळे दिपवणारं आहे. दरम्यान, आशियात सर्वाधिक श्रीमंत असणारे हे अंबानी घराणं फक्त त्यांच्या उद्योगांमुळेच ओळखलं जातं असं नाही. या घराण्याचं राहणीमान, त्यांची आभूषणं, त्यांच्या कोट्यवधी गाड्या, आलीशान बंगले हेदेखील नेहमीच चर्चेचा विषय असतात. याच पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडे नेमकी आभूषणं, दागिने कोणती आहेत? त्यांची किंमत किती आहे? हे जाणून घेऊ या..

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे अनेक रत्नजडीत, हिरेजडीत दागिने आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यादेखील त्यांच्या यूनिक स्टाईल, दागिने, महागडे कपडे यामुळे ओळखल्या जातात. या अंबानी कुटुंबात फक्त नीता अंबानी, ईशा अंबानी यांच्याकडेच महागडे दागिने आहेत, असे नाही. तर अंबानी कुटुंबातील सूनांकडेही थक्क करून टाकणारे दागिने आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अंबानी कुटुंबातील महिलांकडे कोट्यवधी रुपयांची ज्वेलरी आहे. या घरात तब्बल 200 कोटींचे बाजूंबद आहेत. 450 कोटींचा हारदेखील या घरात आहे.

नीता अंबानी यांच्याकडे 200 कोटींचे बाजूबंद

नीता अंबानी यांनी 2024 सालच्या मिस व्लर्ड स्पर्धेच्या अंतीम फेरीच्या कार्यक्रमात एक बाजूबंद परिधान केले होते. हे बाजूबंद काही साधेसुधे नव्हते. या बाजूबंदात मुघलांच्या काळातील कलाकुसर होती. त्यांनी परिधान केलेले हे बाजूबंद शाहजहान यांच्या कुटंबाशी निगडित आहे, असं म्हटलं जातं. या हिरेजडीत बाजूबंदाची किंमत तब्बल 200 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

400 कोटींचा हार

जेव्हा श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचं लग्न झालं, तेव्हा श्लोका महता यांना मौल्यवान असा हार भेट म्हणून देण्यात आला होता. या हारात 407.48 कॅरेटच्या पुखराज रंगाचे हिरे आहेत. या हाराची किंमत तब्बल 451 कोटी असल्याचे बोलले जाते.

ईशा अंबानी यांचा नेकलेस

अंबानी कुटुंबाची मुलगी ईशा अंबानी यादेखील त्यांच्या ग्लॅमरस लूकमुळे ओळखल्या जातात. त्यांच्याजवळ एक अतिशय सुंदर, मौल्यवान असा हिऱ्यांचा नेकलेस आहे. या नेकलेसची किंमत तब्बल 167 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

अनंत अंबानी यांची घडी

अनंत अंबनी यांच्याकडे Patek Philippe ची एक महागडी घडी आहे. या घडीची डिझाईन अगदीच दुर्मिळ अशी आहे. या घडीची किंमत तब्बल 54 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

आकाश अंबानी यांचा ब्रोच

अनंत अंबानी यांना यांच्या साखरपुड्याला आकाश अंबानी यांनी Cartier कंपनीचा एक महागडा ब्रोच गिफ्ट म्हणून दिला होता. हा ब्रोच 18 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेला आहे. त्याच्यावर हिरे तसेच अन्य मौल्यवान खडे लावण्यात आलेले आहेत. या ब्रोचची किंमत तब्बल 13.2 कोटी असल्याचे बोलले जाते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.