
घरात अनेक वेळा अशा वस्तू असतात ज्या विषारी असतात जसे की झोपेच्या गोळ्या, कीटकनाशके, फिनाईल किंवा उंदीर मारण्याची औषधं. या पदार्थांचा अपघाताने किंवा मुद्दाम घेतल्यास जीवघेणा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रसंगी वेळीच दिलेला प्राथमिक उपचार (First Aid) जीव वाचवू शकतो.
आपल्या आजूबाजूच्या अनेक बातम्यांमध्ये आपण ऐकतो की कुणीतरी विष घेतलं आणि योग्य उपचाराअभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे जर कुणी विष घेतलं असेल, तर सर्वप्रथम काय करावं? कोणता उपाय तत्काळ करावा? हे माहित असणं आवश्यक आहे.
विशेषतः ग्रामीण भागात चुकून विष पिण्याच्या घटना अधिक दिसून येतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये, हे जरी खरं असलं तरी काही प्राथमिक उपाय तुम्ही करू शकता.
1. रुग्णाने जर अजून उलटी केली नसेल, तर त्याला थोडं पाणी घालून वाटलेली मोहरी खायला द्यावी. यामुळे शरीरात गेलेलं विष बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.
2. जर मोहरी नसेल, तर एक ग्लास पाण्यात एक मूठ मीठ मिसळून रुग्णाला पाजावं. यामुळेही उलटी होण्याची शक्यता असते.
3. जर रुग्णाने स्वतःहून उलटी केली असेल, तर त्याचा तोंड स्वच्छ करावे आणि शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं.
प्रत्येक विषाचा प्रभाव वेगळा असतो. काही विषं तत्काळ परिणाम करतात तर काहींचा परिणाम काही वेळानंतर दिसतो. उदाहरणार्थ –
1. झोपेच्या गोळ्या आणि काही टॅबलेट्स हळूहळू परिणाम करतात.
2. पण उंदीर मारण्याचे औषधं, फिनाईल, किंवा कापूरच्या गोळ्या अत्यंत घातक असतात आणि काही मिनिटांतच जीवघेण्या ठरू शकतात.
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जबरदस्तीने उलटी करणे धोकादायक ठरू शकते. काही विषं अन्ननलिकेतून उलटी करताना अधिक नुकसान करतात. त्यामुळे उलटी करावी की नाही, हे डॉक्टर ठरवतात.
1. घाबरून न जाता शांत राहा. चुकीचा निर्णय रुग्णाच्या तब्येतीस अधिक घातक ठरू शकतो.
2. काही विष उलटी करताना अन्ननलिकेला अधिक इजा करतात. त्यामुळे जबरदस्तीने उलटी करू देऊ नका.
3. औषधं, कीटकनाशकं यांना लहान मुलांच्या, वृद्धांच्या आवाक्याबाहेर ठेवा. त्यावर लेबल लावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)