
विमानाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्यातच विमानाबाबत आणखी एक गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना जाणून घेण्यासाठी आतुरता असते ते म्हणजे विमानाचा रंग. विमानाचा रंग हा पांढरा असतो. पण इतके सर्व रंग असताना विमानाचा रंग हा पांढराच का असतो? असा विचार कोणी केला आहे का?
विमानाला पांढरा रंगच का असतो?
जवळजवळ प्रत्येक एअरलाइन्सचे विमान पांढऱ्याच रंगाचे असते. कोणत्याही देशाचे विमान असो, लहान विमान असो किंवा मोठे, त्यांचा रंग बहुतेकदा पांढराच असतो. ते फक्त विमान सुंदर दिसण्यासाठीच नसतं तर, त्यामागे एक खास कारण आहे. अनेकांना वाटते की विमान कंपन्या त्यांच्या आवडीचा रंग निवडतात, परंतु पांढऱ्या रंगामागे काही खास कारणं आहेत.
ओरखडे सहज दिसतात
जरी तुम्हाला विमान खूप मोठे दिसत असले तरी ते खूप संवेदनशील असते. जर त्यात थोडासाही निष्काळजीपणा असेल तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. किंवा त्यांचे डेंट पेंट करणे देखील खूप महत्वाचे असते. म्हणूनच विमानाचा रंग पांढरा जातो. पांढरा हा असा रंग आहे ज्यावर कोणताही डाग लगेच दिसतो. त्यामुळे जर विमानाच्या कोणताही पार्टचं नुकसान झालं असेल ते पांढऱ्या रंगावर दिसून येतं. यामुळेच बहुतेक कंपन्यांचे विमान हे पांढऱ्या रंगाचेच असतात.
सहज ट्रॅक करता येतं
दुसरे मोठे कारण म्हणजे त्याच्या पांढऱ्या रंगामुळे ते आकाशात सहजपणे ट्रॅक करता येते. हा रंग इतर रंगांपेक्षा आकाशात जास्त ठळकपणे दिसतो. दुसरीकडे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा रंग फायदेशीर मानला जातो. फ्लाइटचे कोणतेही नुकसान झालं असेल तर ते सहजपणे पाहण्यास आणि ओळखण्यास मदत होते .
तापमान नियंत्रित करते
विमानाचा पांढरा रंग अजून एका गोष्टीसाठी मदत होते.इतर रंगांपेक्षा पांढऱ्या रंगामधून सूर्यप्रकाश लवकर परावर्तित करतो. यामुळे विमानाचे तापमान नियंत्रणात राहते. असे म्हटले जाते की उड्डाणादरम्यान विमानाचे तापमान नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे असते. पांढरा रंग उष्णता शोषत नाही. यामुळे विमान थंड राहते. इतर रंगामुळे विमानाची उष्णता वाढू शकते.
पांढरा रंग हलका असतो
याशिवाय, पांढरा रंग सहज दिसतो आणि हलका असतो. अंधारातही तुम्ही हा रंग अगदी सहज पाहू शकता. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पांढरा रंग सहजासहजी फिकट होत नाही. पांढऱ्या रंगाला सर्वात हलका रंग देखील म्हणतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या विमानाला पांढरा सोडून गडद रंग दिला तर ते 8 प्रवाशांएवढं त्याचं वजन वाढवू शकतं. कारण गडद रंगाचा पेंट हे जड असतो. म्हणून विमानाला पांढरा रंगच दिला जातो