
पावसाळा म्हटलं की बाहेर जशी आर्द्रता असते. तशीच घरात देखील हवेत आर्द्रता जाणवते. दमट वातावरण जास्त प्रमाणात जाणवू लागतं. परंतु ही वाढलेली आर्द्रता घरात किडे, मुंग्या किंवा बुरशीसाठी कारणीभूत ठरतातय. पण एवढंच नाही हवेतील ही आर्द्रता घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी हानिकारक ठरू शकते. पावसाळ्यात फ्रिजच्या तापमानात देखील यामुळे बरेच बदल होऊ लागतात. पण हे बऱ्याच लोकांना माहित नसेल की पावसाळ्यात फ्रिजमध्ये वाटी भरून मीठ का ठेवले जाते. 99 टक्के लोकांना हे माहित नसेल ते किती फायदेशीर आहे ते. लोक वर्षानुवर्षे फ्रिज वापरत आहेत परंतु सर्वांनाच या गोष्टीबद्दल माहित नसेल.
मिठाने भरलेली वाटी फ्रीजमध्ये का ठेवावी?
पावसाळ्यात फ्रिजमधील देखील आर्द्रता वाढते ज्यामुळे त्यात ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होऊ लागतात. एवढेच नाही तर वाढत्या आर्द्रतेमुळे त्यातून दुर्गंधी देखील येऊ लागते. पावसाळ्यात किंवा फ्रिज वारंवार उघडल्यास आत ओलावा जमा होतो. जास्त ओलाव्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागतात आणि बॅक्टेरिया देखील वाढू लागतात.
मिठामध्ये असते ही शक्ती
जर अशावेळी फ्रिजमध्ये मिठाने भरलेली वाटी ठेवली तर ते मीठ ओलावा शोषून घेतं. कारण मिठात ओलावा शोषून घेण्याची शक्ती असते. म्हणूनच, जर फ्रिजमध्ये मिठाने भरलेला वाटी ठेवली तर ते जास्त ओलावा शोषून घेते, ज्यामुळे फ्रिज आतून कोरडा आणि स्वच्छ शिवाय दुर्गंधीमुक्त राहतो.
मीठ दुर्गंधी दूर करते
जेव्हा भाज्या, फळे, शिजवलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या विविध गोष्टी फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवल्या जातात तेव्हा त्यामधून गॅस बाहेर पडू लागतो. हा वायू संपूर्ण फ्रिजमध्ये पसरतो आणि एक विचित्र वास निर्माण करतो. अशा परिस्थितीत मीठ उपयुक्त ठरते कारण ते ओलावा आणि गंध शोषून घेते. यामुळे फ्रिजमधील वास नाहीसा होतो आणि कमी आर्द्रतेमुळे फ्रिजच्या सिस्टीमवर कमी दाब पडतो, ज्यामुळे ते सुरळीतपणे काम करते आणि त्याचे आयुष्य देखील वाढते.
फ्रीजमध्ये मीठ कसे ठेवायचे?
फ्रिजमधील वास आणि ओलावा दूर करण्यासाठी, तुम्ही एका लहान वाटीत किंवा उघड्या छोट्या कंटेनरमध्ये 100 ते 150 ग्रॅम जाड मीठ भरून फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवू शकता. ओलावा शोषल्यानंतर मिठाचा प्रभाव कमी होतो, म्हणून दर 15-20 दिवसांनी ते बदलणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मीठ वापरायचे नसेल तर त्याच्या जागी बेकिंग सोडा देखील वापरता येईल. एका वाटीत बेकिंग सोडा भरून फ्रिजमध्ये ठेवल्यानेही वास कमी होतो. त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून पाहू शकता.