उन्हाळ्यात अक्रोड भिजवून का खावेत? काय आहेत त्याचे फायदे

उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खाणे अधिक फायदेशीर ठरते. अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या दिवसात किती अक्रोड खावेत?

उन्हाळ्यात अक्रोड भिजवून का खावेत? काय आहेत त्याचे फायदे
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 10:31 PM

सुका मेवा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता सुका मेवा भरुन काढतात. तुम्ही सुका मेवा खात असाल तर रोज अक्रोड नक्की खा. अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्यात आढळणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. उन्हाळ्यात अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णता दूर होते.

एका दिवसात किती अक्रोड खावेत?

तुम्ही रोज 2-3 अक्रोड खाऊ शकता. मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता. जास्त अक्रोड खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

अक्रोड भिजवून खावे

उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खावे. यामुळे उष्णता दूर होते आणि पौष्टिक घटक वाढतात. अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी भिजवलेले अक्रोड खा. मात्र, हिवाळ्यात तुम्ही अक्रोड न भिजवता खाऊ शकता.

अक्रोडमध्ये कोणते जीवनसत्व असते?

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड  असते. याशिवाय अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत?

रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे हृदयासाठीही फायदेशीर असतात. अक्रोड तणाव दूर करण्यास मदत करते. यामुळे झोप सुधारण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.