Eye care tips : बदाम आणि तुपापासून बनवा घरीच काजळ; जाणून घ्या फायदे

| Updated on: Jan 10, 2022 | 11:45 AM

तुम्ही तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य काही घरगुती उपयांनी देखील वाढू शकता. आज आपण अशाच एका काजळाबद्दल जाणून घेणार आहोत. तुप आणि बदामापासून तुम्ही हे काजळ तयार करू शकता.

Eye care tips : बदाम आणि तुपापासून बनवा घरीच काजळ; जाणून घ्या फायदे
Follow us on

Eye care tips : व्यक्ती सुंदर दिसण्यामध्ये तिच्या डोळ्यांची महत्त्वाची भूमिका असते. डोळ्यांना सुंदर बनवण्यासाठी ग्राहक मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टींची खरेदी करतात. या वस्तूंमुळे किंवा सौंदर्य प्रसाधनांमुळे व्यक्ती काळी काळ सुंदर दिसू शकते. मात्र त्यामध्ये अनेक हानीकारण केमिकल देखील असतात ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. डेळे हा शरीराचा नाजूक भाग असतो, त्यामुळे अशा वस्तूंचा वापर टाळावा असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जातो. तुम्ही तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य काही घरगुती उपयांनी देखील वाढू शकता. आज आपण अशाच एका काजळाबद्दल जाणून घेणार आहोत. या काजळाचे वैशिष्ट म्हणजे या काजळापासून तुमच्या डोळ्याला कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. हे काजळ अनेक दिवस तुमच्या डोळ्यांमध्ये राहातं. तसेच या काजळाला बनवण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे.

असं बनवा काजळ

दोन ते तीन  बदाम घ्या, बदामाला गॅसवर भाजा. बदाम गॅसवर भाजल्यांतर ते काळे पडतील. बदाम काळे पडल्यानंतर त्याच्यामधून धूर येईल. या बदामाला तुम्ही एका छोट्या प्लेटमध्ये झाकून ठेवा. त्यानंतर त्या प्लेटवर जमा झालेल्या काळ्या पावडरला एका पेपरच्या मदतीने छोट्या भांड्यामध्ये जमा करा. त्यानंतर या पावडरमध्ये थोडेस तुप मिसळवा. जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा या मिश्रणाचा उपयोग तुम्ही काजळ म्हणून करू शकता.

काजळ वापराचे फयादे

या काजळामध्ये बदामचा समावेश असल्याने तुमच्या डोळ्याची थकावट दूर होते. तसेच डोळ्याच्या भोवती जमा झालेले डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होते. तसेच या काजळामुळे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही.  या काजळामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमीन ई असते. याचा डोळ्याला विशेष असा फायदा होतो. तसेच पैशांची देखील बचत होते.

संबंधित बातम्या

Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!

Delhi : ही दिल्लीतील कॉफी आणि चहाची सर्वात खास ठिकाणे, येथे नक्की भेट द्या!

After Delivery | गरोदरपणानंतर केस गळतीनं हैराण? या 5 गोष्टींनी नक्कीच दिलासा मिळेल!