Hotel Room: हॉटेलच्या रूममधून फ्रीमध्ये घरी आणू शकता ‘या’ ५ वस्तू, बिलात एक रुपयाही वाढणार नाही!

Hotel Rooms: हॉटेलमधून चेकआउट करताना रूममध्ये ठेवलेल्या वस्तूंपैकी नेमकं काय सोबत घेऊन जाता येतं, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. काही वस्तू हॉटेलकडून मोफत दिल्या जातात आणि त्या घरीही नेता येतात. अशाच ५ वस्तू कोणत्या, जाणून घ्या.

Hotel Room: हॉटेलच्या रूममधून फ्रीमध्ये घरी आणू शकता ‘या’ ५ वस्तू, बिलात एक रुपयाही वाढणार नाही!
हॉटेल रुम
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 02, 2026 | 2:56 PM

हॉटेलच्या रूममध्ये मिळणाऱ्या सुविधांमध्ये काही अशा गोष्टी असतात, ज्या पाहुणे चेकआउटच्या वेळी सोबत घेऊन जाऊ शकतात. मात्र, रूममध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट मोफत असतेच असं नाही. काही गोष्टी पाहुण्यांच्या वापरासाठी दिल्या जातात, तर काही हॉटेलच्या मालकीच्या असतात. त्यामुळे एखादी गोष्ट सोबत नेण्यापूर्वी ती कॉम्प्लिमेंटरी आहे की नाही, हे तपासणं गरजेचं आहे. नियम माहीत नसताना वस्तू नेल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जाऊ शकतं. त्यामुळे हॉटेलमधून बाहेर पडताना काय घेऊन जाता येतं आणि काय तिथेच ठेवणं आवश्यक आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हॉटेलमधील या ५ वस्तू तुम्ही फ्रीमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. जाणून घ्या कोणत्या

टॉयलेटरीज

हॉटेलच्या बाथरूममध्ये ठेवलेले छोटे साबण, शॅम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश किंवा लोशनचे पॅक सामान्यतः पाहुण्यांच्या वापरासाठी दिले जातात. त्यामुळे न वापरलेले छोटे पॅक सोबत नेता येऊ शकतात. मात्र, मोठ्या बाटल्या किंवा भिंतीवर लावलेल्या डिस्पेंसरमधील उत्पादने नेणे टाळावे.

Loading...

डेंटल, शेव्हिंग आणि शू किट

काही हॉटेलमध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, रेजर, शेव्हिंग क्रीम, शू पॉलिशिंग साहित्य यांसारख्या वस्तू दिल्या जातात. या वस्तू वैयक्तिक वापरासाठी आणि अनेकदा एकदाच वापरण्यासाठी असतात. या ट्रॅव्हलमध्ये कामी येतात. त्यामुळे हॉटेलने त्या कॉम्प्लिमेंटरी दिल्या असतील, तर सोबत नेता येतात.

डिस्पोजेबल चप्पल

रूममध्ये दिल्या जाणाऱ्या हलक्या डिस्पोजेबल चप्पल पाहुण्यांच्या वापरासाठी असतात. वापरानंतर या चप्पल सोबत नेण्यास अनेक हॉटेलमध्ये हरकत नसते. मात्र, हॉटेलच्या नियमांनुसार याबाबत वेगवेगळी पॉलिसी असू शकते.

पेन आणि नोटपॅड

डेस्कवर ठेवलेले पेन, छोटं नोटपॅड किंवा हॉटेलची माहिती असलेले काही स्टेशनरी साहित्य अनेकदा पाहुण्यांसाठी ठेवलेले असते. त्यामुळे अशा छोट्या वस्तू सोबत नेता येतात.

चहा-कॉफीचे छोटे पॅक

रूममध्ये ठेवलेले चहा, कॉफी, साखर, क्रीमर किंवा हॉट चॉकलेटचे छोटे सॅशे सामान्यतः कॉम्प्लिमेंटरी असतात. त्यामुळे न वापरलेले पॅक सोबत नेता येतात. मात्र, मिनीबारमधील प्रत्येक वस्तू मोफत असेलच असे नाही.

या वस्तू मात्र घेऊ नका

हॉटेलच्या रूममधील टॉवेल, ड्रेसिंग गाऊन, हेअर ड्रायर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कप, ग्लास, डेकोरेशनच्या वस्तू किंवा रूममधील इतर कायमस्वरूपी वस्तू सोबत नेऊ नयेत. या वस्तू हॉटेलच्या मालकीच्या असतात. त्या नेल्यास हॉटेलकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे एखादी वस्तू मोफत आहे की हॉटेलची मालमत्ता, याबाबत शंका असल्यास चेकआउटपूर्वी रिसेप्शनकडे विचारणे योग्य ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us