
लहान मुलांच बालपण हे खूप निरागस असतं. अशास्थितीत मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टी यांच्यातील फरक समजत नाही. त्यामुळे त्यांना खरं-खोटं याचे ज्ञान नसते. कधी कधी मुलं घाबरल्यामुळे एखादी चुकीची गोष्ट किंवा आपली चुक समजू नये नाहीतर ओरडा मिळेल या भितीने खोटं बोलू लागतात. पण वेळीच पालकांनी मुलांची ही सवय सुधारली नाही तर मुलं जसजशी मोठी होऊ लागतात तशी आणखीन खोटं बोलू लागतात आणि त्यांच्या वाईट सवयींपैकी एक होऊ लागते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना खोटं बोलण्याची सवय लागु नये म्हणून काळजी घ्यावी. जर तुमचे मूलं खोट बोलत असेल तर तुम्ही नक्की कोणत्या पाच गोष्टी सांगायला हव्यात ते पाहूया जेणेकरून ते त्यांची चूक कबूल करण्यास आणि खोटे बोलणे टाळण्यास घाबरणार नाहीत.
रागावण्यापूर्वी, समजावून सांगा
जेव्हा तुमची मुलं खोटं बोलतात तेव्हा रागावू नका. फक्त त्यांना सांगा की तुम्ही खरं बोलल्याने लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील, तर खोटं बोलल्याने समस्या आणखीन वाढतात. जसे की तुम्ही मुलांना त्यांचा भाषेत असे सांगु शकतात की, “खरं बोलल्याने तुम्ही अधिक स्ट्रॉग मजबूत व्हाल. तर खोटं बोलल्याने फक्त समस्या वाढतच जातील.”
तुम्ही मुलांसाठी एक उदाहरण बना
लहान मुलं त्यांच्या पालकांकडून सर्वात चांगल्या आणि वाईट सवयी कॉपी करत असतात. जर तुम्ही तुमची चूक मान्य केली आणि खरी काय आहे ते सांगितलं तर तुमची मुलं सुद्धा खरं बोलायला लागतील. त्यांना पटवून द्या की मी खरं बोलल्याने सर्व काही ठिक झालं आहे. अशी छोटी उदाहरणे द्या. यामुळे तुमच्या मुलाला हे समजेल की खरं बोलणे किती महत्त्वाचे आहे.
खोटे बोलल्याने कोणत्या चुका आणखीन होऊ शकतात ते सांगा
तुमच्या मुलांना समजवून सांगा की खोटं बोलल्यास कोणत्या चूक होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलांनी एखादी गोष्ट तोडली आणि खोटे बोलत असेल की ते त्यांने तोडलेच नाही तर समजावून सांगा की खोटा बोलल्याने एखादयाचा विश्वास तुटू शकतो आणि अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. हे तुमच्या मुलाला समजण्यास मदत करेल की खरं बोलणे नेहमी योग्य असते.
तुमच्या मुलाने खरं सांगितल्यावर त्यांची स्तुती करा
जेव्हा तुमची मुलं खरं बोलतात तेव्हा त्यांची स्तुती करा. यामुळे मुलांना आनंद होईल आणि यापुढे ते नेहमी खरं बोलतील.
मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण निर्माण करा
तुमच्यात व मुलांमध्ये बोलण्यात इतकं मोकळेपणा असावा की मुले तुमच्याशी बोलताना कोणताही विचार न करता किंवा न डगमगता सर्व गोष्टी सांगू शकतील. जेव्हा त्यांना माहित असेल की तुम्ही रागावल्याशिवाय ऐकाल, तेव्हा ते खोटे बोलणार नाहीत. दररोज तुमच्या मुलासोबत थोडा वेळ घालवा, त्यांचे दिवसभराचे अनुभव ऐका आणि प्रश्न विचारा.
मुलांमध्ये ही सवय लावणे का महत्त्वाचे आहे?
खरं बोलण्याची सवय लावणे हे केवळ नैतिकता शिकवण्यासाठीच नाही तर मानसिक शक्ती निर्माण करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा मुलांना कळते की तुम्ही त्यांच्या गरजा समजून घेता आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करता तेव्हा ते अधिक आत्मविश्वासू आणि जबाबदार बनतात.
खरं बोलण्याची सवय लावल्याने मुलं केवळ प्रामाणिकच नाही तर त्यांच्या निर्णयांमध्ये दृढ आणि आत्मविश्वासू देखील बनते. त्यामुळे तुमची मुलं खोटे बोलत असेल, तर या पाच गोष्टी फॉलो करा. अशाने तुमच्या मुलांना खरे बोलण्यास आणि एक मजबूत, जबाबदार व्यक्ती बनण्यास मदत होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)