AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीची साफसफाई करण्यासाठी आता घरच्याघरी बनवा DIY क्लिनर लिक्विड, ‘हे’ आहेत 5 बेस्ट ऑप्शन

काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण सुरू होणार आहे. दिवाळीत लक्ष्मी देवीचे आगमन होत असते यासाठी घर स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे. तर आजच्या लेखात आपण साफसफाई लवकर व सोपे करण्यासाठी हे DIY क्लिनर लिक्विड कसे बनवायचे ते जाणून घेऊयात...

दिवाळीची साफसफाई करण्यासाठी आता घरच्याघरी बनवा DIY क्लिनर लिक्विड, 'हे' आहेत 5 बेस्ट ऑप्शन
| Updated on: Oct 13, 2025 | 11:04 AM
Share

दिवाळी सण हा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. दिवाळी म्हटंल की प्रत्येक घरात आनंद आणि उत्साह येतो. बाजारपेठ सजवली जातात. तसेच फराळाची तयारी आणि मिठाईचा सुंगध सर्वत्र पसरतो. तर या दिवाळीची तयारी आपण प्रत्येकजण किमान एक महिना आधीच सुरू करतोच, कारण पाच दिवस चालणाऱ्या या सणासाठी स्वच्छतेपासून ते घर सजवण्यापर्यंत खूप काम करावे लागते. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. या दिवसांमध्ये स्वयंपाकघरातील चिकट झालेल्या भिंती बाथरूममधील डाग आणि खिडक्यांवर साचलेली घाण साफ करणे खूप कठीण आणि वेळ खाऊ असते. तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्ही DIY क्लीनर लिक्विड बनवू शकता जे कमी वेळातच पूर्ण घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.

घराची साफसफाई करताना भिंतीवर फरशीवर असलेले डाग साफ करने आणि त्यात पितल-तांब्यांची भांडी साफ करण्यासाठी खूप मेहनत, डिटर्जंट, साबण आणि वेळ देखील खूप लागतो. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती वस्तूंपासून DIY क्लीनर कसे बनवायचे ते जाणून घेऊयात जे खूप प्रभावी ठरू शकते.

खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी हे क्लीनर बनवा

तुमच्या घरातील दरवाजे आणि खिडक्यांची काचं स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये दोन चमचे पांढरा व्हिनेगर, दोन कप कोमट पाणी, एक चमचा कॉर्नस्टार्च आणि एक कप रबिंग अल्कोहोल मिक्स करा. याचा वापर खिडक्यांवर दरवाज्यावर करून तुम्ही काही वेळातच त्यावरील डाग सहज साफ करू शकाल.

तेलकट डाग काढून टाकण्यासाठी क्लिनर

तेलाचे डाग खूप चिकट असतात आणि ते काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळेस हे घरगुती क्लिनर बनवा. यासाठी दोन कप पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा कॅस्टिल साबण मिक्स करून क्लिनर बनवा. यामुळे भिंतींवरील तेलकट डाग देखील दूर होतात.

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी क्लिनर

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. कारण स्वयंपाकघरातील भिंती आणि फरशीवर तेलकट डाग असतात आणि त्यासोबत या ठिकाणी असलेली भांडी देखील तेलकट होतात. तर किचनमधील भिंती आणि फरशी स्वच्छ करण्यासाठी, चार कप कोमट पाणी घ्या, 1/4 कप डिशवॉशिंग लिक्विड साबण आणि 1/4 कप बेकिंग सोडा मिक्स करून क्लिनर तयार करा. याचा वापर सिंकपासून रेफ्रिजरेटर, स्टीलची भांडी, स्वयंपाकघराचा ओटा आणि इतर स्वयंपाकघरातील उपकरणे स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो.

तांबे आणि पितळासाठी क्लिनर

जर तुम्ही दिवाळीच्या पूजेसाठी लागणाीरे तांब्याची किंवा पितळेची भांडी बाहेर काढली असतील, पण ती बरेच महिने तशीच ठेवल्यानंतर काळी पडली असतील, तर ती स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिक्स करून हे लिक्विड भांड्यांना लावा आणि 5-6 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्क्रबरने घासून भांडी नव्यासारखी चमकदार दिसतील

कीटकांना बाहेर काढण्यासाठीचे क्लिनर

दिवाळीच्या साफसफाई दरम्यान घराच्या कानाकोपऱ्यातून कीटक बाहेर पडतात. त्यांच्यापासून मुक्त मिळवण्यासाठी दोन चमचे टी ट्री ऑईल, समान प्रमाणात कडुलिंबाचे तेल, 1/4 कप बेकिंग सोडा, लसणाचा रस आणि दोन कप पाणी मिक्स करून एक लिक्विड तयार करा. हे लिक्विड ज्या ठिकाणी कीटक लपण्याची शक्यता असते त्या ठिकाणी स्प्रे करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.