AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस मुळापासून होतील मजबूत, फक्त ‘हा’ आयुर्वेदिक हेअरपॅक आठवड्यातून दोनदा लावा

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक घटक खूप फायदेशीर ठरतात. या लेखात आपण एका आयुर्वेदिक हेअर पॅकबद्दल जाणून घेणार आहोत. जो तुमचे केस मुळापासून मजबूत करून केस गळणे कमी करण्यास मदत करेल.

केस मुळापासून होतील मजबूत, फक्त 'हा' आयुर्वेदिक हेअरपॅक आठवड्यातून दोनदा लावा
hairImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 11:35 PM
Share

केस प्रमाणापेक्षा जास्त गळू लागल्यावर ही कोणासाठीही चिंतेची बाब ठरते. कारण केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रदूषण, अनहेल्दी आहार, केसांसाठी केमिकल प्रोडक्टचा अती वापर या सर्वांमुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ होत असते. यामुळेच आता बाजारात विविध प्रकारचे महागडे सीरम, तेल आणि कॉस्मेटिक उपचार उपलब्ध आहेत. मात्र बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी आपण आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या नैसर्गिक घटकांना अधिकाधिक करावा. कारण यामुळे कोणतेच साईड इफेक्ट केसांना होत नाही.

कारण नैसर्गिक घटकांमध्ये अनेक पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. चला तर मग आयुर्वेदिक नैसर्गिक हेअर पॅकबद्दल जाणून घेऊयात. जो तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करेल.या पॅकचे इतरही अनेक फायदे आहेत तेही जाणून घेऊयात.

आयुर्वेदिक हेअरपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 मोठा चमचा आवळा पावडर, 1 मोठा चमचा मेथीच्या दाण्यांची पावडर, 1 मोठा चमचा जास्वंदीच्या पानांची पेस्ट (ताजी वाटलेली), 1-2 मोठे चमचे दही , 1 छोटा चमचा खोबरेल तेल, 1 छोटा चमचा कोरफडी जेल लागेल.

हेअरपॅक कसा तयार करावा?

एका मोठ्या भांड्यात आवळा पावडर, मेथीच्या दाण्यांची पावडर आणि इतर सर्व साहित्य एकत्र करून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. पेस्टचा घट्टपणा एकसारखा असावा, पेस्ट खूप पातळ किंवा खूप कोरडी नसावी. पेस्टचा पोत असा असावा की ती टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत समान रीतीने पसरेल.

हेअरपॅक केसांना लावण्याची पद्धत

या पेस्टचा थोडासा भाग हातावर घ्या आणि तो टाळू, केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना समान रीतीने लावा. सुरुवातीला केसांचे लहान लहान भाग करा आणि पेस्ट व्यवस्थित लावा. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

या पॅकचे अनेक फायदे आहेत.

तुम्ही हा पॅक आठवड्यातून 1-2 वेळा तुमच्या केसांना लावू शकता. जेव्हाही हा पॅक तुम्हाला लावायचा असेल तेव्हाच तो तयार करा, जेणेकरून तुमच्या केसांना त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. आवळ्याच्या वापरामुळे हा पॅक तुमच्या केसांची मुळे मजबूत करतो आणि कोंडा कमी करतो. तसेच खोबरेल तेल आणि कोरफड जेलच्या वापरामुळे केस गळणे कमी होते, केस मऊ होतात. तसेच केसांचा कोरडेपणा कमी होतो.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.