AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Hike : ज्याची भीती तेच घडले… पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थेट मोठी वाढ, तब्बल इतक्या रूपयांनी..

Petrol-Diesel Price Hike : सरकारकडून पुन्हा एकदा आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मोठा दणका बसलाय. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळतोय.

Petrol-Diesel Price Hike : ज्याची भीती तेच घडले... पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थेट मोठी वाढ, तब्बल इतक्या रूपयांनी..
Petrol-Diesel Price Hike
| Updated on: May 25, 2026 | 7:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये आता चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. नव्या किमती आज सकाळपासून देशभरात लागू करण्यात आल्या. हा सर्वसामान्य नागरिकांकरिता मोठा दणका म्हणावा लागेल. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. इराण युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचा तुटवडा आहे. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत मोठी वाढ होत आहे. त्याचाच हा परिणाम भारतात बघायल मिळतोय. देशभरात आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 2.61 रूपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.71 ने वाढ झाली आहे.

गेल्या दहा दिवसांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमधील ही चाैथी वाढ आहे. जर इराण आणि अमेरिका युद्ध थांबलेच नाही तर किमतीमध्ये अशीच वाढ होईल. महागाई वाढत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत म्हटले होते की, नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा व्यवस्थित वापर करून काटकसरीने वापरावे. शिवाय विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन केले होते.

होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा होण्यास समस्या येत आहे. शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्याने रिफानरीवरही ताण आहे. अनेक देशात लॉकडाऊनही स्थिती आहे. परकिय चलणावरील दबाव कमी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने पुढील 1 वर्षाकरिता खरेदी न करण्याचे आवाहन केले. शिवाय एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ भारताला बसताना दिसत आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला धावले आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात हे युद्ध असली तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ