बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
Shoe Odor Removal Tips : ऑफिस, कॉलेज वा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बुटांची दुर्गंधी तुमची इमेज खराब करु शकते. अनेकदा बुटांना धुण्यास वेळ नसतो. त्यामुळे काही घरगुती उपाय केल्यास दुर्गंधी दुर होण्यास मदत होते. ते उपाय पाहूयात...

Shoe Odor Removal Tips : उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने समस्या वाढत असतात. खास करुन पायाच्या आणि बुटांच्या दुर्गंधीमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी ऑकवर्ड वाटते. अनेकदा बूट वरुन स्वच्छ दिसतात. परंतू त्यातून तीव्र दुर्गंधी येते. ऑफीस असो की कार्यालय वा कोणत्याही पब्लिक प्लेसवर तुमचा बूट तुमची इमेज खराब करु शकतात.
अनेक लोक बुट धुण्याचा कंटाळा करतात. अनेकांना इतका वेळ नसतो. अशात काही सोप्या टीप्स आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही बुट न धुता देखील त्याच्या दुर्गंधीवर उपाय शोधू शकता. चला तर पाहूयात बुटातून येणारी दुर्गंध बुट न धुता कसा घालवायचा….
बुटांमध्ये दुर्गंधी येण्याचे कारण
आपल्या पायांना शरीराच्या इतर भागापेक्षा जास्त घाम येत असतो. घाम हा स्वत: दुर्गंधीयुक्त नसतो. मात्र, जर हा घाम बुटात कोंडला गेला तर आद्रता तयार होते. या आद्रतेमुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी एक योग्य वातावरण होते. हे बॅक्टेरिया जेव्हा घामाचे विघटन करतात तेव्हा दुर्गंधी तयार होते. जर तुम्ही रोज पाय धूत असाल, तरी बुटाच्या आता बॅक्टेरिया बनत राहात असल्याने पुन्हा दुर्गंधी येऊ लागते.
या उपायांनी बुटातील दुर्गंधी दूर करा
1. बेकिंग सोडा वापरा – बेकिंग सोडा दुर्गंधी रोखण्यास खूप उपयुक्त असतो. यासाठी एका कपड्यात वा मोज्यात थोडा बेकींग सोडा भरा. आणि यास रात्रभर बुटाच्या आत ठेवा. सकाळपर्यंत दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी होते.
2. व्हीनेगरने करा सफाई – व्हीनेगरमध्ये बॅक्टीरिया आणि फंगस समाप्त करण्याची ताकद असते. यासाठी व्हीनेगर आणि पाणी समप्रमाणात घ्या. यास स्प्रेच्या बाटलीत भरा आणि या स्प्रेला बुटांच्या आता फवारा आणि नंतर बुटांना काही वेळ उन्हात ठेवा. त्यामुळे बुट फ्रेश आणि साफ तसेच दुर्गंधी मुक्त होतील.
3. रबिंग अल्कोहलचा वापर करावा – रबिंग अल्कोहल देखील बॅक्टेरियांना समाप्त करते. याचा वापर करण्यासाठी कॉटनला अल्कोहोलमध्ये भिजवा. हा बोळा बुटांच्या आतून चांगला फिरवा आणि रात्रभर बुटात तो ठेवा, सकाळपर्यंत सर्व दुर्गंधी दूर होईल.
बुटांची योग्य काळजी घेण्याच्या टिप्स
1. रोज बुटांना मोकळी हवा लागू द्या
2. अनेक दिवस तेच बुट सतत घालू नका
3. चामडी बुट नसतील तर महिन्यातून एकदा बुटांना धूवा
4. स्वच्छ मोजे घालण्याची सवय बाळगा