Chandrapur Lok sabha result 2019 : चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ निकाल

Chandrapur Lok sabha result 2019 : चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ निकाल
चंद्रपूर : बाळू धानोरकर

चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ : चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी बाजी मारली. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला.  चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा  64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का दीड टक्क्यांनी वाढला. हा मतदारसंघ देशात गाजल्याने मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , काँग्रेसकडून बाळू धानोरकर  आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत होती.

चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना हंसराज अहीर (भाजप) पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीबाळू धानोरकर (काँग्रेस)विजयी
अपक्ष/इतरअ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

महाराष्ट्रातील राजकीय दृष्या रंगतदार लढत म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा लढतीकडे पाहिले जाते. शिवसेनेतून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आणि काँग्रेसच्या केंद्रीय यादीत नाव नसताना ऐनवेळी तिकीट मिळालेल्या बाळू धानोरकर यांच्या आव्हानाने ही जागा चर्चेत राहिली.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात दीड टक्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली. मागील खेपेस ती 63.25 टक्के होती.

विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी

 

 विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी

               2014                   2019

चंद्रपूर        54.79                 53.10

बल्लारपूर    61.31                64.16

राजुरा          68.87               69.61

वरोरा          62.76                63.35

वणी            67.19               71.81

आर्णी           66.82               69.52

एकूण        63.25                64.66

यंदा शेती व्यवसाय अधिक असलेल्या वणी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. 2019 मधील चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 08 हजार 555 मतदारांपैकी 12 लाख 34 हजार 101 (पुरुष- 6 लाख 52 हजार 285   महिला – 5 लाख 81 हजार  811) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात दीड टक्यांनी वाढ झाली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातसर्वात कमी मतदान झालं.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्ये, कोणाकोणाच्या सभा?

– केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उमेदवारीमुळे ही जागा प्रतिष्ठेची ठरली

– अहीर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळू धानोरकर यांना अंतिम क्षणी रिंगणात उतरविले

– या क्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अशोक चव्हाण यांच्या सभा झाल्या

– मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सभा घेतल्या

– प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांनी देखील सभा घेत मतं मागितली

– बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, जमीन अधिग्रहणाचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न चर्चेत राहिले

– जातीने गवळी असलेले अहीर आणि दारूचा व्यवसाय असलेले धानोरकर यांच्या निवडीसंदर्भात दूधवाला हवा की दारुवाला अशी बोचरी चर्चा रंगली.

– काँग्रेसने ओबीसी-मुस्लिम-दलित अशी मोट बांधून प्रचार केला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI