AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे घे नाही तर… बीडमध्ये धक्कादायक घटना, थेट भावालाच..

Beed News : बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. त्यामध्येच आता एक धक्कादायक घटना पुढे आली. एका टोळक्यांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला‌ करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे घे नाही तर... बीडमध्ये धक्कादायक घटना, थेट भावालाच..
Beed
| Updated on: Jun 30, 2026 | 7:47 AM
Share

तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस ? असे म्हणत पाच जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला‌ करण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. एका महिन्यानंतरही आरोपी मोकाट असल्याची पीडित तरुणाच्या आईनी तक्रार केली. सराईत गुन्हेगार असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. गुन्हा दाखल असूनही त्याला कोणी अटक करत नाही म्हणत पीडितेच्या आईने थेट बीडच्या पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली. हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आले. आरोपी वारंवार परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला क्रुरपणे मारत असल्याचे दिसत आहे. अंगावर थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.

बीडच्या गेवराई शहरालगत 26 मे रोजी रात्री मंगेश भुराजी शिंदे नामक तरुणावर तुझ्या बहिणीने माझ्यावर केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस? असे म्हणत प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंगेशच्या मित्राला पिस्तूलचा धाक दाखवून पळवून लावले. त्यानंतर आरोपींनी मंगेशवर कुऱ्हाड, चाकू आणि लोखंडी रॉडने वार करत दगडाने ठेचत गंभीर जखमी केले.

जखमी मंगेशवर बीड येथील सरकारी रुग्णालयावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सचिन राठोड, अरबाज शेख आणि इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत, ते सराईत एक गुन्हेगार आहेत, त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे तरी त्यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार पीडित तरुणाच्या आईने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

दरम्यान हल्ल्याचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून यामध्ये आरोपी तरुणाला अतिशय क्रुरपणे मारत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या अंधारात वारंवार बारी-बारीने परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला दगडाने ठेचत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकेवर काढताना दिसत आहे. केजमध्ये विलास घुले याची हत्या करण्यात आली. टोळक्याने विलास घुलेवर हल्ला चढवला. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाने नाव आले.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प