AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलास घुले हत्याकांडात खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, मृत्यूआधी सगळे सांगितले, थेट देवेंद्र फडणवीस यांनी..

Beed News : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा तूफान चर्चेत आहे. बीडची वाढती गुन्हेगारी राज्यभर चर्चेत राहिली. यादरम्यानच आता थेट केजमध्ये एक हत्या झाली. या हत्येत खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. गुन्हा दाखल होत नसल्याने नातेवाईक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विकास घुले याचा मृतदेह पोलिस ठाण्यातच आणला.

विलास घुले हत्याकांडात खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, मृत्यूआधी सगळे सांगितले, थेट देवेंद्र फडणवीस यांनी..
Vilas Ghule case
| Updated on: Jun 24, 2026 | 10:17 AM
Share

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले याची हत्या करण्यात आली. भांडण मिटवण्यासाठी गेल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात सुरूवातीपासूनच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे नाव पुढे येत आहे. विलास घुले हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करा या मागणीसाठी नातेवाईक गेल्या तीन दिवसापासून आक्रमक आहेत. सौरभ बजरंग सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. अखेर पोलिसांकडून मोठे आश्वासन नातेवाईकांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात हस्तक्षेप केला. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण जबाबात त्याचे नाव नोंदवण्यात आले. सौरभ सोनवणे हाच या हत्येमागील सूत्रधार असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नव्हती आणि आरोपींना अटकही केले जात नव्हते. आक्रमक होत नातेवाईकांनी थेट विकास घुले याचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी ज्यावेळी विलास घुले याची हत्या करत होते, त्यावेळी ते सतत सौरभ बजरंग सोनवणेचे नाव घेत होते. ते व्हिडीओमध्येही स्पष्ट झाले. सौरभ बजरंग सोनवणेच्या पाठबळामुळेच कृत्य घडले, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विलास घुले याचा भाऊ रमेश घुले याने केली होती. मात्र, खासदार बजरंग सोनवणे यांनी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

एसपींनी तपास करावा आणि आरोपींनी अटक करावे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. अखेर पोलिसांनी या प्रकरणात सौरभ बजरंग सोनवणे याचे नाव जबाबात घेतले. विकास घुले यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला. विलास घुले यांची हत्या नक्की कशी करण्यात आली, याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली. केज पोलिस ठाण्याबाहेर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास ठेवण्यात आला. रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीचा मुद्दा अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा यांनीही मांडला.

Follow Us
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप