100 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी, डॉ. प्रीतम मुंडेंची संपत्ती किती?

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आपली संपत्ती प्रतिज्ञापत्रातून सांगणे बंधनकारक असतं. अनेकांना उमेदवारांच्या संपत्तीचं कुतुहलही असतं. गाडी-बंगला नसलेल्या उमेदवारांपासून गाड्यांच्या रांगा नि कोट्यवधींची संपत्ती असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या संपत्तीबाबतही अनेकांना कुतुहल आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची …

pritam munde, 100 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी, डॉ. प्रीतम मुंडेंची संपत्ती किती?

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आपली संपत्ती प्रतिज्ञापत्रातून सांगणे बंधनकारक असतं. अनेकांना उमेदवारांच्या संपत्तीचं कुतुहलही असतं. गाडी-बंगला नसलेल्या उमेदवारांपासून गाड्यांच्या रांगा नि कोट्यवधींची संपत्ती असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या संपत्तीबाबतही अनेकांना कुतुहल आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संप्तती समोर आली आहे.

डॉ. प्रीतम मुंडे यांची संपत्ती :

 • जंगम मालमत्ता : 10 कोटी 47 लाख 70 हजार 949 रुपये
 • स्थावर मालमत्ता : 3 कोटी 87 लाख 48 हजार 654 रुपये
 • बँकेत रोख : 45 लाख 61 हजार 929 रुपये
 • हातातील रोख रक्कम : 3 लाख 70 हजार 125 रुपये
 • मुदत ठेवी : 5 लाख 28 हजार 152 रुपये
 • शेअर्स : 1,72,72,569
 • सोने : 100 ग्रॅम (किंमत – 3 लाख 20 हजार रुपये)
 • चांदी : 5 किलो (किंमत – 1 लाख 92 हजार 500 रुपये)
 • दागिने : 8 लाख रुपये
 • कर्ज : 8 कोटी 62 लाख 77 हजार 794 रुपये

डॉ. प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे यांची एकूण संपत्ती :

 • जंगम मालमत्ता : 2 कोटी 21 लाख 2 हजार 323 रुपये
 • स्थावर मालमत्ता : 18 लाख 56 हजार रुपये
 • हातातील रोख रक्कम : 5 लाख 95 हजार 939 रुपये
 • बँकेत रोख : 5 लाख 95 हजार 939 रुपये
 • कर्ज : 1 कोटी 25 लाख 56 हजार रुपये
 • वाहन : ऑडी कार (किंमत – 22 लाख रुपये)

बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे लढत आहेत. बजरंग सोनवणे हेही बीडमधील ताकदवान नेते मानले जातात. तसेच, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. शेकडो जणांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी बजरंग सोनवणे यांनीही प्रतिज्ञापत्र सादर केला.

बजरंग सोनवणे यांची संपत्ती

 • जंगम मालमत्ता : 2 कोटी 52 लाख 11 हजार 409 रुपये
 • स्थावर मालमत्ता : 1 कोटी 63 लाख रुपये
 • कर्ज : 64 लाख 23 हजार 301 रुपये

बजरंग सोनवणे यांची पत्नी सारिका सोनवणे यांची संपत्ती :

 • जंगम मालमत्ता : 1 कोटी 12 लाख 36 हजार रुपये
 • स्थावर मालमत्ता : 58 लाख 50 हजार रुपये
 • कर्ज : 14 लाख 39 हजार 801 रुपये
 • वाहन : 1 स्कॉर्पिओ, तीन ट्रॅक्टर (किंमत – 3 लाख 75 हजार रुपये), 1 टँकर (किंमत – 15 लाख 34 हजार 996 रुपये)

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *