AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सगळेजन तिचाच लाड करतात’; नालासोपाऱ्यात चिमुकल्याचं 5 वर्षांच्या बहिणीसोबत भयंकर कृत्य, जंगलातील ते दृश्य पाहून पोलिसही हादरले

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

'सगळेजन तिचाच लाड करतात'; नालासोपाऱ्यात चिमुकल्याचं 5 वर्षांच्या बहिणीसोबत भयंकर कृत्य, जंगलातील ते दृश्य पाहून पोलिसही हादरले
| Updated on: Mar 02, 2025 | 9:42 PM
Share

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, 13 वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच 5 वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केली आहे. रविवारी पाहटे चार वाजता या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात सापडला आहे, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घरातील सर्वजण तिचाच लाड करतात, माझा कोणी लाड करत नाही. हा राग मनात धरून, नालासोपार्‍यात एका 5 वर्षांच्या चिमुरडीची 13 वर्षाच्या अल्पवयीन आतेभावाने निर्घृणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. रविवारी पहाटे 4 वाजता एका जंगलात या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे हत्येचा उलगडा झाला असून, याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिद्राखातून खान (वय 5) असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व श्रीराम नगर परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तर 13 वर्षांचा आरोपी ही त्यांच्या घराच्या शेजारीच राहत होता.

घरातील सर्वचजण तिचा लाड करतात आणि त्याचा कोणी लाड करत नाही, हा राग मनात धरून अल्पवयीन आतेभावानेच आपल्या मामेबहिणीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून, घटनेबाबत तपासाला सुरुवात केली आहे.

घटनेनं खळबळ

दरम्यान अवघ्या तेरा वर्षांच्या मुलानं आपल्याच मामेबहिणीची हत्या केली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसणार नाही, मात्र या मुलानं या चिमुरडीची हत्या केली, ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे, या चिमुरडीचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. केवळ तिचाच सर्वजण लाड करतात आणि आपला कोणीच लाड करत नाही, या भावनेतून त्याने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार