धक्कादायक, नाशकात 19 वर्षांच्या तरुणीची विक्री.. तिला कसलं आमिष दाखवलं, तिच्यासोबत काय केलं?

नशिक शहरात नक्की सुरु तरी काय? तब्बल 2 लाख रुपयांत 19 वर्षांच्या तरुणीची विक्री.. 'त्या' दोन महिलांनी तिलं कसलं आमिष दाखवलं... त्यानंतर तिच्यासोबत काय केलं? धक्कादायक प्रकरणामुळे उडाली खळबळ

धक्कादायक, नाशकात 19 वर्षांच्या तरुणीची विक्री.. तिला कसलं आमिष दाखवलं, तिच्यासोबत काय केलं?
फाईल फोटो
| Updated on: Mar 02, 2026 | 11:33 AM

नाशिक शहर आता मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण नाशिकमध्ये अशी एक घडना घडली आहे जी खरंच हादरवणारी आहे… 19 वर्षीय तरुणीची विक्री केल्यानंतर तिच्यासोबत काय केलं.. हे कळल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… पण पोलिसांच्या कारवाईमुळे तरुणीची सुखरुप सुटका झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दोन लाखांत 19 वर्षीय तरुणीची विक्री करून तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे… घडलेल्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे… आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

तरुणीला इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून दोन महिलांनी मालेगावमार्गे जातेगावला नेलं. त्यानंतर तिचं बळजबरी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तरुणीची सुखरुप सुटका झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस कारवाई करत असताना स्थानिकांनी घेराव घातल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण ग्रामीण हद्दीत जाऊन सातपूर पोलिसांनी धडक कारवाई करत तरुणीची सुटका केली आहे.

नाहीय पोलिसांनी तरुणीची सुखरूप सुटका केली. संबंधित महिला व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याघटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, विक्री ताजं असताना, नाशिकमधून आणखी एक धक्कादाायक माहिती समोर येत आहे.

नाशिक शहरातून एक मुलगा आणि तीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक घटना शहराच्या विविध ठिकाणी घडल्या आहेत. म्हसरूळ , भद्रकाली, गंगापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

म्हसरूळ परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर रवींद्रनाथ टागोर नगर भागातून मुलगा बेपत्त व गंगापूर रोड परिसरात मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चारही प्रकरणांमध्ये कुणीतरी त्यांना पळवून नेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

सांगायचं झालं तर, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून किती अल्पवयीन बेपत्ता होत असतील… याबद्दल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे याठिकाणी पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे देशाच्या कोणत्या कोपऱ्यात मुली सुरक्षित आहेत?  रोज मुलींचं अपहरण, बलात्कार एवढंच नाही तर, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या… यांसारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत असतात…

Follow Us