सुनेत्रा पवारांसोबत दोन तासांची बैठक, चर्चा नेमकी कशावर? मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलं

Ncp merger suspense: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पूर्णविराम दिलेला नाही, मात्र या चर्चांबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. सुनेत्रा पवार या कामकाजासाठी आल्या होत्या, आजच्या बैठकीत विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सुनेत्रा पवारांसोबत दोन तासांची बैठक, चर्चा नेमकी कशावर? मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलं
ncp merger suspense
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 6:48 PM

सुनेत्रा पवार या कामकाजासाठी आलेल्या होत्या. आज कोणत्याही विलिनीकरणाची चर्चा नव्हती. मी पुन्हा सांगतो, विलिनीकरणाच्या चर्चा खरंच असत्या तर त्यांनी आमच्याशी चर्चा केलीच असती कारण आम्ही सत्तेत सोबत आहोत, त्यामुळे मला वाटतं की, अद्यापतरी आमच्याशी कोणीही विलिनीकरणासंबंधी चर्चा केलेली नाही. त्यांनी चर्चा सुरु केलेली असती तरी किमान त्यांनी आम्हाला सांगितलं तरी असतं की आमची अशी चर्चा सुरु आहे. किमान मला असं वाटतं की, या चर्चा फक्त मीडियामध्ये ऐकायला मिळत आहेत. प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीने आम्हाला कोणीही सांगितलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही, आजच्या चर्चेमध्ये तशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा सुरु होत्या त्यावर आता पुन्हा सस्पेन्स कायम राहिला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us