AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचे लोड शेडिंग !, महापालिका क्षेत्रात आणि २७ गावांचे पाणीबाणीचे वेळापत्रक जारी

अल निनोमुळे 31 ऑगस्टपर्यंत कमी पर्जन्यमानाचा अंदाज असल्याने यंदा महाराष्ट्रात पाण्याच्या मोठा तुटवडा जाणवत आहे. अशाच प्रकारे पावसाने ओढ देण्याचा क्रम चालू राहाण्याचा अंदाज असल्याने उरलेले पाणी टीकवण्यासाठी आता केडीएमसी आणि एमआयडीसीकडून विशेष पाणी नियोजन करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचे लोड शेडिंग !, महापालिका क्षेत्रात आणि २७ गावांचे पाणीबाणीचे वेळापत्रक जारी
water supply cut in kdmc
| Updated on: Jun 26, 2026 | 5:06 PM
Share

कल्याण आणि डोंबिवली ही खरी तर स्वतंत्र महापालिका होईल इतकी या शहरांची लोकसंख्या आणि वाढ झाली आहे. गेली अनेक वर्षे या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली असताना आणि आता पाण्याच्या असमान वाटपाने अनेक भागातील पाणी समस्या कायम पाचवीला पूजलेली असताना या मान्सूनमध्ये कल्याण आणि डोंबिवलीवर पाणी बंदीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या भागाला एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याणच्या रहिवाशांना पाणी बचत करावी लागणार आहे.

अल निनोमुळे 31 ऑगस्टपर्यंत कमी पर्जन्यमानाचा अंदाज असल्याने यंदा महाराष्ट्रात पाण्याच्या मोठा तुटवडा जाणवत आहे. अशाच प्रकारे पावसाने ओढ देण्याचा क्रम चालू राहाण्याचा अंदाज असल्याने उरलेले पाणी टीकवण्यासाठी आता केडीएमसी आणि एमआयडीसीकडून विशेष पाणी नियोजन करण्यात आले आहे.

दोन दिवस टँकर देखील बंद

30 जूनला संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 24 तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर शटडाऊनच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी असे दोन दिवस टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या 27 गाव परिसरात शुक्रवार ते रविवार 48 तासांचा शटडाऊन असणार आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागपूरातही पाणीबाणी

वीजपुरवठा बाधित झाल्याने शुक्रवारी नागपूर मनपाच्या 10 झोनपैकी 9 झोनमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाला. महावितरणच्या मनसर सबस्टेशनमध्ये अचानक तांत्रिक बिघड झाल्यामुळे नवेगाव वॉटर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. धरणातून येणारे रॉ वॉटरचे पंपिंग ठप्प झाले आहे, या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी संध्याकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

तसेच आज सकाळी शहरातील तब्बल नऊ झोनमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, तर काही ठिकाणी पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. वीज पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब झाल्याने नागपूरकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गोरेवाडा आणि गोधणी येथील शुद्धीकरण केंद्रांना रॉ वॉटर पुरवणारे नवेगाव खैरी धरण हा नागपूरचा एकमेव एकमेव मुख्य स्त्रोत आहे. पाण्याच्या पंपिंगमधील या व्यत्ययामुळे जलशुद्धीकरण आणि पुढील वितरण प्रक्रियेचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. आज लक्ष्मी नगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन ,गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, आशी नगर झोन, मंगळवारी झोन मधील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन