नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या 244 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सध्या 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोबतच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही.

नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या 244 रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सध्या 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोबतच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 703 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 48, बागलाण 7, चांदवड 25, देवळा 6, दिंडोरी 30, इगतपुरी 5, कळवण 16, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड 114, पेठ 1, सिन्नर 133, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 अशा एकूण 472 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 244, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 23 रुग्ण असून असे एकूण 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 109 रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यू, चिकुन गुन्याही वाढला

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान डेंग्यूचे एकूण 2295 नमुने घेण्यात आले. त्यात 888 रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात चिकुन गुन्याचे 2295 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 633 रुग्ण आढळले आहेत. आता परतीच्या पावसाने थैमान घातल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यात या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या आठवड्यात महापालिकेने 258 रुग्णांचे नमुने तपासले. त्यातही 55 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे. महापालिकेने चिकुन गुन्याचे 94 नमुने तपासले आहेत. त्यात 23 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचेही रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. सिन्नर, येवला, निफाडमध्ये वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्ह्यात अजूनही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे.

इतर बातम्याः

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

Gold Special: खणखणीत परतावा देणारं हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!

नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI