नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत

जगभरात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून प्रख्यात असणाऱ्या दादासाहेब फाळके यांचे नाशिकमधले स्मारक अखेर कात टाकणार आहे. 'बीओटी' तत्त्वावर होणाऱ्या या कामासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मंत्राज ही संस्था स्पर्धेत आहे.

नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत
नाशिक येथील दादासाहेब फाळके स्मारक.


मनोज कुलकर्णी, नाशिकः जगभरात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून प्रख्यात असणाऱ्या दादासाहेब फाळके यांचे नाशिकमधले स्मारक अखेर कात टाकणार आहे. ‘बीओटी’ तत्त्वावर होणाऱ्या या कामासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मंत्राज ही संस्था स्पर्धेत आहे.

दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरचा. त्यांनी अनेक नाटके केली. राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. त्यांच्या स्मरणार्थ पांडव लेणीच्या पायथ्याशी साधरणतः 1999 -2000 मध्ये फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली. 29 एकर जागेवर भव्य स्मारक उभारले. स्मारकात प्रवेशासाठी सुरुवातीला शुल्क आकारले गेले. मात्र, देखभाल दुरुस्ती आणि महापालिकेच्या व्यावसायिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे हा प्रकल्प तोट्यात गेला. गेल्या अठरा वर्षांतर महापालिकेने या स्मारकावर जवळपास अठरा कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. मात्र, त्यातून फक्त आठ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे या स्मारकाला अवकळा आली. ध्यान स्थान, कॉन्फरन्सिंग हॉल, प्रदर्शन केंद्र, संगीत कारंजे एकेक करत बंद पडले. त्यामुळे स्वतःच्या जन्मगावातच दादासाहेबांचे स्मारक एक समृद्ध अडगळ झाली. आता खासगीकरणातून या स्मारकाची देखभाल दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. महापौर सतीश कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबत रामोजी फिल्मसिटी, बालाजी टेलीफिल्मच्या एकता कपूर आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी मंत्राज संस्था आणि नितीन चंद्रकांत देसाई यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यांच्या निविदा लवकरच उघडल्या जाऊ शकतात. या दोघांपैकी एकाला या स्मारकाचे रूपडे बदलण्याची संधी मिळू शकते.

नवे काय असणार?
दादासाहेब फाळके यांच्या नावाचे स्मारक खरे तर नाशिकरांच्या शिरपेचातील तुरा व्हायला हवे. मात्र, दुर्लक्षामुळे या स्मारकाची वाट लागली. फरशा उखडल्या. एकेक वस्तू बंद पडली. आता या डागडुजीसोबतच इथे चित्रपट विषयक अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे समजते. त्यात चित्रपटाच्या शुटींगबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच नागरिकांनाही भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास इथे जाणून घेता येईल. तब्बल दोन एकरावर वसलेल्या या स्मारकामध्ये दादासाहेब फाळके यांचा पूर्णाकृती नव्हे, तर अर्धाकृतीही पुतळा नाही. त्याबद्दल महापालिकेने आर्थिक तरतूदही केली होती. मात्र, त्याची निविदाच काढली नाही. आता या नव्या कामात पुतळा बसवणार का, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता; सकाळपासून ढगाळ वातावरण

अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI