VIDEO : ठाण्यातील 30 ते 35 गोडाऊनला आग

ठाणे : ठाण्यात 30 ते 35 भंगार गोडाऊनला आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ठाण्यातील शीळ डायघर भागातील डोसिया कम्पाऊंडर येथे घडली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमनदलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही. दुपारच्या सुमारास ही आग शीळ डायघर भागात लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात …

VIDEO : ठाण्यातील 30 ते 35 गोडाऊनला आग

ठाणे : ठाण्यात 30 ते 35 भंगार गोडाऊनला आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ठाण्यातील शीळ डायघर भागातील डोसिया कम्पाऊंडर येथे घडली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमनदलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही.

दुपारच्या सुमारास ही आग शीळ डायघर भागात लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि गोडाऊन आहेत. येथे छोटे-मोठे व्यपारी वर्ग आपली काम करतात. तसेच इथे केमिकल आणि कापडाचेही गोडाऊन मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग कशी लागली यावर सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. ही आग लावली असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *