AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात पावसाची 35 टक्के तूट, धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव, परिस्थिती गंभीर

मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यात पावसाची 35 टक्के तूट, धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव, परिस्थिती गंभीर
G SrikanthImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 5:54 PM
Share

मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. मराठवाड्यात सर्वाधिक ५० टक्के तूट लातूर जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये ४० टक्के, तर परभणीत ४३ टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडला असला, तरी तिथेही सुमारे २६ टक्के तूट कायम आहे.

टँकरने पाणी पुरवठा 

पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २४६ टँकर्स सुरू ठेवावे लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२० टँकर्स बीड जिल्ह्यात, ९६ टँकर्स छत्रपती संभाजीनगर आणि २२ टँकर्स जालन्यात सुरू आहेत.

धरणात पाणी कमी 

मराठवाड्यातील ९१७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणात काही प्रमाणात साठा असला, तरी मांजरा धरणात अवघा १० टक्के पाणीसाठा उरल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. नद्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंद केले जाणारे बंधारे यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यातच बंद करण्यात आले आहेत.

मराठवाड्यामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमानमध्ये एकंदरीत ३५ टक्के तूट आहे. त्यापैकी सर्वात जास्त लातूरमध्ये ५० टक्के तूट आहे. आज रोजी ४० टक्के धाराशिवमध्ये तूट आहे. बीडमध्ये ४० टक्के तूट आहे, परभणीमध्ये ४३ टक्के तूट आहे आणि सर्वात चांगलं जे आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये पाऊस पडलेला आहे.  तरी देखील त्या ठिकाणी २६ टक्के तूट आहे, अशी माहिती यावेळी जी श्रीकांत यांनी दिली आहे.

मराठवाड्यामध्ये पावसाळ्यातही टँकर्स चालू आहेत. आज रोजी २४६ टँकर्स आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त बीडमध्ये १२०, जालन्यामध्ये २२ आणि संभाजीनगरमध्ये ९६ टँकर्सने पाणीपुरवठा होत आहे. मराठवाड्यात मोठे प्रकल्प, मध्यम, लघु आणि नदीवरील बंधारे असे ९१७ बंधारे आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आज रोजी अपेक्षित असलेल्या पाणीसाठ्यापेक्षा या पाणीसाठ्यात ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणामध्ये जरी पाणीसाठा असला तरी इतर मोठ्या धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती देखील यावेळी जी श्रीकांत यांनी दिली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्वांना रेग्युलरली फील्ड व्हिजिट्स करणे, तालुका कृषी अधिकारी यांनी फील्ड व्हिजिट्स करून दुष्काळाची सदृश्य परिस्थिती काय आहे, पिकाची परिस्थिती काय आहे, ते अंदाज घेणे आणि त्या अनुषंगाने आज-उद्यामध्ये शासनाला एक प्राथमिक अहवाल आमच्याकडून पाठवला जाणार आहे, जो कृषी विभागाचा एक तक्ता आमच्याकडे आला आहे, त्यानुसार आम्ही अहवाल सादर करणार आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

Follow Us
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!