AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Children Rescue : “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका, मध्य रेल्वे आरपीएफची कामगिरी

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे.

Children Rescue : ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका, मध्य रेल्वे आरपीएफची कामगिरी
"ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत 6 महिन्यांत 745 मुलांची सुटकाImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 8:02 PM
Share

मुंबई : हरवलेल्या किंवा काही कारणाने घरातून पळून आलेल्या मुलांच्या बचावासाठी मध्य रेल्वेने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” (Operation Nanhe Ferishte) ही मोहिम राबवली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या 6 महिन्यांत म्हणजे जानेवारी 2022 ते जून 2022 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील 745 मुलांची सुटका (Rescued) केली आहे. यामध्ये 490 मुले आणि 255 मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे.

भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक 381 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून, त्यात 270 मुले आणि 111 मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागात 138 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात 72 मुले व 66 मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात 136 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये 98 मुले आणि 38 मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागात सुटका केलेल्या 56 मुलांमध्ये 30 मुले आणि 26 मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात सुटका केलेल्या 34 मुलांची नोंद झाली असून त्यात 20 मुले व 14 मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुलींसह 971 मुलांची सुटका केली आहे. (745 children rescued by RPF in 6 months under Operation Nanhe Ferishte)

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.