AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता; भाजपच्या बड्या नेत्यानं असं का म्हंटलं?

सध्या पुण्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते पुण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाजप नेत्यानं एक विधान चर्चेत आले आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता; भाजपच्या बड्या नेत्यानं असं का म्हंटलं?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 16, 2023 | 11:29 AM
Share

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना स्वतः कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत प्रचाराला यावं लागतंय असं माध्यम प्रतिनिधींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना विचारलं होतं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ता आहे, उपमुख्यमंत्री नंतर आहे त्यामुळे ते पुण्यात प्रचाराला आले असतील तर त्यात काही विशेष नाही असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. इतकंच काय पुढील काळात जसाजसा प्रचार वाढेल तसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते येऊन प्रचार करतील असेही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पुण्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाण मांडून आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच विजय व्हायला हवा यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहे.

बावनकुळे यांच्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील पुण्यात तळ ठोकून आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातील दिग्गज नेत्याला लक्ष घालवं लागत असल्याने चर्चा होत आहे.

आमदार, मंत्री, पदाधिकारी पुण्यात असतांना देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहे. त्यामुळे चर्चा होत असतांना बावनकुळे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री नंतर आहे आधी कार्यकर्ता आहे असे बावनकुळे यांनी म्हंटलय.

तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीतील स्थिती काय आहे? भाजपला यश मिळेल का ? सर्व्हे काय सांगतो असे विचारताच बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. निकालाच्या दिवशी कळेल कोण निवडणूक येईल असं बावनकुळे म्हणाले.

याशिवाय मी काही सर्व्हे करणारा नाही, माझं काम हे प्रचार आणि प्रसार करणे हे आहे. जशी मतदान प्रक्रिया जवळ येईल तसे तसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते पुण्यात येतील असेही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. राहुल कलाटे यांचा फटका कुणाला बसेल यावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं नाहीये.

एकूणच पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मॅरेथॉन बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या काय सूचना दिल्या आहेत. काय रणनीती ठरली आहे, यावरही बोलणं टाळत बावनकुळे यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.