AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संकटात साथ देणारा खरा मित्र;” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणालेत?

समाजाने संकट आली तेव्हा बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. समाजाबरोबर सगळे येतात. संकटात साथ देणारा खरा मित्र असतो. याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

संकटात साथ देणारा खरा मित्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणालेत?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 12, 2023 | 4:44 PM
Share

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज आहे. निसर्गातील लढाऊ असा हा बंजारा समाज आहे. बंजारा समाजाचा ध्वज उभा राहिला. सेवालाल महाराज यांचा अश्वारुढ पुतळा याठिकाणी उभा राहिला. संजय राठोड हे सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्याचा हा परिणाम आहे. संत रामराव बापू यांनीसुद्धा पाठपुरावा केला. त्यामुळं या भूमिपूजनाचा योग आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बंजारा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. संजय राठोड यांच्या मागणीनुसार ५० कोटी रुपये बोर्डाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

वसंतराव नाईक महामंडळाला पैसे कमी पडू देणार नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. तांडा वस्ती सुधारयोजनेत चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, शाळा, दवाखाना, अंगणवाडी देण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

येथे होणार बंजारा समाजाचे भवन

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बंजारा समाजाच्या पाठीशी आहे. शिक्षणासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. पूर्णपणे खर्च करेल. हेदेखीन सांगतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बंजारा समाज भवनाची मागणी केली आहे. नवी मुंबईत बंजारा समाजाचं भवन होईल. अनेक मागण्या केल्या आहेत. वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बंजारा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय

मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. बंजारा समाज हा कष्ट करून पुढं आला पाहिजे. या मागणीला सरकारचा पाठिंबा आहे. राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे. बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ५९३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

संकटात साथ देणारा खरा मित्र

संजय राठोड हे समाजाच्या मागणी मान्य करण्यासाठी मागे लागले असतात. आपल्या हक्काचा माणूस आहे. समाजाने संकट आली तेव्हा बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. समाजाबरोबर सगळे येतात. संकटात साथ देणारा खरा मित्र असतो. याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

135 फुट उंच सेवाध्वजाचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री श्री क्षेत्र पोहरादेवीच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पोहरादेवीत 593 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी करण्यात आली. सोबतच संत सेवालाल महाराजांच्या पंचधातू पुतळ्याचे व 135 फुट उंच सेवाध्वजाचे अनावरण झाले.

बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत लाखो बंजारा बांधवांनी हजेरी लावली. बंदोबस्तासाठी 1 हजार पोलीस तैनात होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आला. पोहरादेवीत स्वागताचे मोठे होर्डिंग लागले होते.

विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.