AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा, देशभरात नेमके काय कार्यक्रम होणार? वाचा A टू Z

केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शाहा यांनी मोठी घोषणा केली आहे.

मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा, देशभरात नेमके काय कार्यक्रम होणार? वाचा A टू Z
amit shah and pm modi
| Updated on: Sep 13, 2026 | 5:12 PM
Share

केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शाहा यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित केेले जाईल, असे शाह यांनी सांगितले. येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या एका महिन्याच्या काळात देशभरात हे अभियान राबवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

सेवासंकप्ल अभियानाची माहिती देण्याची ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे अमित शाह यांनी केली आहे. आधी गुजरातनंतर संपूर्ण देशात जन्मदिवस साजरा केला जात होता. यावर्षी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोदीजी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहे. या देशात खूप कमी लोक आणि नेते असे आहेत जे राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधान अशी पदे भूषवताना देशाचे नेतृत्व करत आले आहेत असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत  ‘सेवासंकल्प अभियान’ सुरु करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. जनकल्याण,राज्य आणि राष्ट्रसेवेच्या या यज्ञाला अहर्निश सुरु ठेवणे महत्वाचे आहे.त्यामुळे सेवा संकल्प अभियान सर्व देशात रावबला जाणार आहे. प्रत्येक भाजपाच्या प्रत्येक विभाग, जिल्ह्यात, प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात हे अभियान राबवले जाणार असल्याचेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

देशभरात विविध कार्यक्रम

या मोहिमेत देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस अत्यंत वेगळ्या प्रकारे केला जाणार आहे. या अभियानात 12 वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. रक्तदान, आभार, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसे ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण