सीजेपी आंदोलनात आदित्य ठाकरेंची एन्ट्री; पोलिसांच्या कारवाईनंतर शिवसैनिकांना दिला महत्वाचा संदेश, अचानक काय घडलं?

सीजेपी आंदोलनात आदित्य ठाकरेंची एन्ट्री झाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर शिवसैनिकांना महत्वाचा संदेश दिला आहे. ते मुंबईत बोलत होते.

सीजेपी आंदोलनात आदित्य ठाकरेंची एन्ट्री; पोलिसांच्या कारवाईनंतर शिवसैनिकांना दिला महत्वाचा संदेश, अचानक काय घडलं?
Aaditya thackeray
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 5:35 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संपूर्ण देशात रान पेटलं आहे.  इंडिया आघाडीनंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली. सीजेपीने आज शनिवारी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु सीजेपीच्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांना आंदोनलाआधीच पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं. आंदोलनाच्या एक दिवस आधी दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तर 57 मेट्रो स्टेशन बंद केले. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही कार्यकर्त्यांनी मुंबईतही आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईच्या या आंदोलनात महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी सहभागी होणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांची एन्ट्री झाली.

मुंबईच्या विविध ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे.  हुतात्मा चौक ते ऑगस्ट क्रांती मैदानातही आंदोलन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीनेही हुतात्मा स्मारक परिसरात आंदोलन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनाला निघालेल्या तुषार गांधी यांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये भेटायला निघाले.

Loading...

डीएन नगरला पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप विरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. हे आपल्याला रस्त्यावर दिसतच आहे. आम्ही डीएन नगर येथे आलो आहोत. डी. एन. नगर येथे ताब्यात घेण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना पोलिसांनी सोडलं पाहिजे. वातावरण चिघळण्याआधी सोडलं पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक रस्त्यावर उतरेल’.  प्रतिक्रिया देऊन आदित्य ठाकरे हे डीएननगर पोलीस स्टेशनबाहेर पोहोचल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसने डीएन नगर पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केली.

 

ऑगस्ट क्रांती मैदानात तणावपूर्ण वातावरण 

मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मैदानाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. युवा तरुणंना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.  महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्याआधीच तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us