AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपकेंचा व्हिडीओ आला अन्…प्लॅन बी बाहेर काढून पोलिसांना धप्पा; दिल्लीतील CJP च्या आंदोलनात कसा गेम केला?

दीपके यांना अटक होताच त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा समोर आली.

अभिजीत दीपकेंचा व्हिडीओ आला अन्...प्लॅन बी बाहेर काढून पोलिसांना धप्पा; दिल्लीतील CJP च्या आंदोलनात कसा गेम केला?
abhijeet dipke and cjp delhi protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 5:01 PM
Share

Abhijeet Dipke Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातील शेकडो लोक दिल्लीमध्ये पोहोचत आहेत. परंतु आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे.

दिल्लीला सध्या छावणीचं रुप आलंय. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यूट्यूबर ध्रुव राठी, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सीजेपीचा भाग असलेले आशुतोष रांका, सौरभ दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

दरम्यान, आम्हाला पोलीस ताब्यता घेऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊनच सीजेपीने आपला ब्लॅन बी आखला होता. अभिजीत दीपके यांनी अगोदरच आंदोलन कसे असेल, आंदलोनाचे नेतृत्त्व कोण करेल, याचे नियोजन लावून ठेवले होते. देशवासीयांना याची माहिती देण्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता. आम्हाला अटक झाली तरीही आंदोलन पुढे चालूच राहिले पाहिजे, याचे दीपके तसेच अन्य कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते.

आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे

दीपके यांना अटक होताच त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा समोर आली. आता दिल्लीतील या आंदोलनाचे नेतृत्त्व सीजेपीचा भाग असलेले अजिंक्य शिंदे करत आहेत. अजिंक्य शिंदे यांनी केलेल्या सूचनांचे सर्वांना पालन करावे, असे आवाहन दीपके यांनी केलेले आहे.

दीपके यांनी अगोदरच नियोजन करून ठेवले

दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनाची हवा निघून जाईल, असा पोलिसांचा विचार होता. परंतु सीजेपीने दीपके यांच्यानंतर आंदलोन कोण सांभाळेल याचे नियोजन अगोदरच करून ठेवले होते. त्यामुळे पोलिसांपुढे ऐनवेळी एक वेगळे आव्हान निर्माण झाले.

आंदोलनाचे पुढे नेमके काय होणार?

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 500 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. परंतु काहीही झाले तरीही हे आंदोलन सुरूच राहणार, असा निश्चय आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे विरोधकांकडूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक