MPSC आंदोलनात अभिजीत दिपके बोलायला उभे राहिले, तिकडून विद्यार्थीनीचे तीन प्रश्न, राजकीय पक्षांची बोलती बंद

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात अभिजीत दिपकेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न उपस्थित केले, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

MPSC आंदोलनात अभिजीत दिपके बोलायला उभे राहिले, तिकडून विद्यार्थीनीचे तीन प्रश्न, राजकीय पक्षांची बोलती बंद
Abhijit Dipke pune protest
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 10:41 PM

अभिजीत दिपके रोहित पवारांच्या पुण्यातील MPSC आंदोलनस्थळी दाखल झाले असून तिथे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवारांचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, रोहित सर म्हणतात मार्गदर्शन करा, मी काय मार्गदर्शन करून हे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. आपल्या देशाची परिस्थिती सध्या अशी आहे जो शिकलेला आहे ज्याच्याकडे डिग्री आहे ते रस्त्यावरती बसले आहेत आणि त्यांच्याकडे डिग्री नाही ते खुर्चीवरती बसले आहेत. शिक्षणाची जाणीव नाही शिक्षणाची कदर नाही कोणाला. भाषण मी आणखी शिकतोय.विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधू.

यावेळी एका विद्यार्थीनीने सांगितलं की, मला तीन प्रश्न विचारायचेत. कुणीही उत्तर द्यावीत. जर आपण स्वतंत्र भारतात जगतोय, तर आज आपण शिक्षणासाठी मैदानात का उतरलो? जेव्हा आपण मतदान करतो. बेसिक गोष्टी पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण मतदान करतो पण इथे अन्नासाठी शेतकरी मरतो, शिक्षणासाठी विद्यार्थी रस्त्यावर येतो. माता भगिनी सुरक्षित नसतील, आम्ही अधिकारी बनून देशाचीच सेवा करणार आहोत, पण त्यासाठीही अशी अडवणूक होणार असेल. भ्रष्ट अधिकारी वाटा अडवून बसले असतील, तर काय करायचं, याचं उत्तर कोणीही द्यावं, हे प्रश्न ऐकून अभिजीत काही क्षण स्तब्ध झालेले पाहायला मिळाले.

Loading...

आयपीएलमध्ये जशा क्रिकेटरच्या बोल्या लावता…

दरम्यान, यावेळी एका विद्यार्थीनीने काही प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये आम्ही परिक्षेची तयारी करतो आणि मध्येच कळतं की, आता परिक्षा डिस्क्रिप्टिव्ह करतात नंतर मध्येच म्हणतात की, यूपीएससीच्या धरतीवर आम्ही एमपीएससी आणतोय, पेपर कसे चेक करायचे हेही यांना माहिती नाही. पेपर वन पेपर टूमध्ये गुणांची मोठी तफावत प्रश्न उपस्थित केला की २०, ४० लाख रुपये घेऊन पेपर फोडतात आणि लोकांना पास करतात. त्यावर बोलताना अभिजीत दिपकेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं की, मला आता असं वाटतंय आयपीएलमध्ये जशा क्रिकेटरच्या बोल्या लावता तशाचल तुम्ही कॅन्डिडेटच्या बोल्या लावा, परिक्षांची गरजच काय? ऑक्शनप्रमाणे एमपीएससीचे सीट द्या. आमदार फोडतानाही तुम्ही तेच करतात. ५० खोके आणि एकदम ओके. एमपीएससीतही तेच करा. तुम्हाला परिक्षा घेण्याची आवश्यकताच नाही. इलेक्श्नमध्येही तुम्ही तेच करा. जो जास्त पैसे देईल त्याला सीट द्या, यामुळे कमीत कमी काळा पैसातरी थांबेल, व्हाईट व्यवहार होऊन जातील, असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us