अचानक पडला बेशुद्ध अन् थोड्याच वेळात गोविंदाचा मृत्यू, आतापर्यंत 95 जखमी, दहीहंडी उत्सवाला गालबोट

शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंद जखमी झाले आहेत.

अचानक पडला बेशुद्ध अन् थोड्याच वेळात गोविंदाचा मृत्यू, आतापर्यंत 95 जखमी,  दहीहंडी उत्सवाला गालबोट
Dahi Handi Accident
| Updated on: Aug 16, 2025 | 10:48 PM

राज्यात सर्वत्र आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खासकरून मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंद जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुर आहेत. तसेच काही गोविंदांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दहीहंडीत किती जण जखमी झाले

समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन गोविंदांचा मृत्यू झाला आहे. रात्री 9 वाजेपर्यंत 95 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 19 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

जखमी गोविंदांची माहिती

  • मुंबई शहर – जखमी 30 ; उपचार सुरु असणारे – 11 (जी टी रुग्णालयात 1 गंभीर – नाव श्रेयस चाळके, 23 वर्षे), 19 जणांना डिस्चार्ज
  • मुंबई पूर्व उपनगर – जखमी 31; उपचार सुरु असणारे – 5, 26 जणांना डिस्चार्ज
  • मुंबई पश्चिम उपनगर – जखमी 34; उपचार सुरु असणारे 3 (बीडीबीए, कांदिवली रुग्णालयात 1 गंभीर; नाव आर्यन यादव, 9 वर्षे) 31 जणांना डिस्चार्ज
  • एकूण: जखमी 95; उपचार सुरु असणारे 19 ( 2 गंभीर); 76 जणांना डिस्चार्ज

गावदेवी गोविंदा पथकातील 14 वर्षीय रोहन मोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. रोहन अंधेरीतल्या दहीहंडीत सहभागी न होता एका टेम्पोत बसलेला असताना तो अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला मृत्यू झाला आहे. याआधी जगमोहन शिवकिरन चौधरी (32) या गोविंदाचा मृत्यू झाला होता.

वसई विरारमध्ये 3 गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सवात वसई विरारमध्ये 3 गोविंदा जखमी झाले असून, त्यांच्यावर वसई विरार महापालिकेच्या विजय नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ भक्ती चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. रोहन गुप्ता(हाताला दुखापत), सर्वेश डांगे (वय 22 वर्ष) (डोक्याला गंभीर मार), तन्मय तेली (वय 14 वर्ष) (हाताला जखम ) अशी जखमी गोविंदांची नावे आहेत. सध्या या तिन्ही गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.