AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यक्रमाला जाण्याआधीच आक्रित घडलं… भररस्त्यात काका पुतण्याचा मृत्यू; धुळ्यातील घटनेने हळहळ

Accident News : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. धुळ्याजवळ माती वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने चिरडल्याने काका पुतण्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

कार्यक्रमाला जाण्याआधीच आक्रित घडलं... भररस्त्यात काका पुतण्याचा मृत्यू; धुळ्यातील घटनेने हळहळ
Dhule AccidentImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 01, 2026 | 3:04 PM
Share

धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. माती वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने तिघांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात काका पुतण्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील नरडाणा गावाजवळ ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आले आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धुळ्यात भीषण अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नरडाणा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव डंपरने दोन मोटरसायकलींना धडक देत चिरडले. या अपघातात अपघातात एका मोटरसायकल वर असलेले गणेश ज्ञानेश्वर माळी (वय 22) आणि सुमीत देविदास माळी (वय 14) यांचा मृत्यू झाला. बेटावद येथे कार्यक्रमासाठी जात असताना माळी या काका पुतण्याचा अपघात झाला. तसेच दुसऱ्या मोटरसायकलवर असलेल्या सुधाकर श्रावण बडगुजर (वय 50 )यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्रापूरमध्येही अपघात

याआधी आज पुणे–अहिल्यानगर मार्गावर शिक्रापूर येथे भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पुणे–अहिल्यानगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

पुणे–नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोचा अपघात

त्याच बरोबर पुणे–नाशिक महामार्ग क्रमांक 60 वरील शिंदेवाडी चौकात भीषण अपघात झाला. मोठ्या स्पीड ब्रेकरवरून जात असताना आयशर टेम्पो जोरात आदळला आणि नियंत्रण सुटल्याने तो थेट विरुद्ध दिशेने गेल्याने अपघात झाला. या भीषण धडकेत टेम्पोचा केबिन पूर्णपणे चिरडला गेला असून चालक त्यामध्ये अडकून दबला गेला आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने शिंदेवाडी चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत