VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीत

| Updated on: Jun 01, 2021 | 8:20 AM

केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा खेडमधील भोस्ते घाटात अपघात झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर केमिकलची गळती झाली.

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीत
Mumbai-Goa highway Accident
Follow us on

रत्नागिरी : केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा खेडमधील भोस्ते घाटात अपघात झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर केमिकलची गळती झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर झालेल्या केमिकल गळतीमुळे अनेक वाहने घसरली आहेत. (Accident on Mumbai-Goa highway, chemical spill from tanker, traffic disrupted due to falling vehicles)

खेडमधील भोस्ते घाटात हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे टँकरमधून केमिकलची गळती झाली. केमिकल गळतीमुळे महामार्गावर केमिकल पसरले. क्रिष्टल एसपी नावाचं हे केमिकल असल्याची माहिती पोलिसांची दिली आहे.

संध्याकाळी महामार्ग ठप्प होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. केमिकल महामार्गावर पसरल्याने सहा ते सात दुचाकी घसरल्या. सायंकाळी 5:30 वाजता हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. साधारणपणे 8 च्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण, नागपूरमध्ये खळबळ

प्रेमात विकृती ! महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, प्रियकराचं संतापजनक कृत्य

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती, रुग्णालयात उपचार सुरु

(Accident on Mumbai-Goa highway, chemical spill from tanker, traffic disrupted due to falling vehicles)