रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका, 39 दुकानदारांवर गुन्हे, 87 निलंबित, 48 दुकानांचे परवाने रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. त्यावर सरकारने थेट कारवाई केली आहे (Ration shops black marketing amid lockdown).

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका, 39 दुकानदारांवर गुन्हे, 87 निलंबित, 48 दुकानांचे परवाने रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. यामध्ये भुजबळांची जवळपास प्रत्येक सभेला उपस्थिती होती. या सभांमधले त्यांचे वाक्य तर गाजलेच, शिवाय सध्या सुरु असलेल्या सभांमध्येही त्यांचे काही डायलॉग व्हायरल होत आहेत.
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 1:07 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. सरकारने अशा अनेक दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे (Ration shops black marketing amid lockdown). आतापर्यंत (19 एप्रिल 2020) अनियमितता आणि नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचं निलंबन करण्यात आलं आहे, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. स्वस्तधान्य दुकानांमध्ये वाटप करताना कमी धान्य देणे किंवा जास्त पैसे घेणे, नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

राज्यातील वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनीच संबंधित कारवाई केली आहे. राज्यातील 6 महसुली विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचे निलंबन, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

नागपूर विभागात एकूण 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 18 रेशन दुकानांचं निलंबन, तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11 दुकानांवर तर वर्धा जिल्ह्यात 4 दुकानांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची कारवाई नागपूर शहर भागात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती विभागात एकूण 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 7 रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. 13 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 3 दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली आहे. वाशिम जिल्ह्यात 5 दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात 4 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 2 गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागात 29 रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले.

Ration shops black marketing amid lockdown

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.