‘बुलेटची’ हौस दुचाकीस्वारांना पडली महागात; सायलेंसर आणि नंबरप्लेटही केल्या जप्त…

बुलेटला मॉडीफाय करण्याच्या नादात वाहनामध्ये छेडछाड करून वेगवेगळे बदल करत असतात. अनेकजण सायलेंसर बदलून मोठा आवाज येणारा तसेच फटाक्यांसारखा आवाज येणारा सायलेंसर बसवून गर्दीच्या ठिकाणी बुलेट फिरवण्याचे फॅड वाढले आहे.

'बुलेटची' हौस दुचाकीस्वारांना पडली महागात; सायलेंसर आणि नंबरप्लेटही केल्या जप्त...
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 6:34 PM

चंद्रपूर: बुलेटला कर्णकर्कश हार्न बसवून मोठ्या प्रमाणात आवाज काढणाऱ्या बुलेटराजांवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आता कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाईदरम्यानच त्यांचे कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेंसर, मॉडीफाय केलेले नंबरप्लेटही काढण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत पाच बुलेटराजांवर कारवाई करत प्रत्येकी 12 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे बुलेटराजांचे धाबे दणाणले असून चंद्रपूरातील बुलेटप्रेमींवर आता भीतीचे वातावरण पसरले आहे. तरुणांमध्ये कर्कश्श दुचाकी वाहनांचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अनेक तरुण बुलेटला मॉडीफाय करण्याच्या नादात वाहनामध्ये छेडछाड करून वेगवेगळे बदल करत असतात. अनेकजण सायलेंसर बदलून मोठा आवाज येणारा तसेच फटाक्यांसारखा आवाज येणारा सायलेंसर बसवून गर्दीच्या ठिकाणी बुलेट फिरवण्याचे फॅड वाढले आहे. या दुचाकीस्वारांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही याचा त्रास होतो आहे.

या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

बाब गांभीर्याने घेत विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पथक तैनात करण्यात आली आहेत.

दुचाकीच्या या आवाजामुळे शाळा, महाविद्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार फिरत असतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरातील विद्यार्थी आणि रुग्णांना याचा त्रास होत असतो. या कारवाईमुळे आता जोरदार आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता चाप बसणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या कारवाईमुळे आता दुचाकीबरोबरच वाहनाबाबत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जोरदार आवाज करत बुलेट घेऊन फिरणाऱ्यांमुळे नागरिकांना आवाजाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे वेगवेगळ्या आवाज करत फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केल्यामुळे आता या अशा प्रकार थांबण्यास मदत होतील असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Non Stop LIVE Update
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.