सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न (Sayaji Shinde extinguish tree fire) केला.

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

पुणे : अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न (Sayaji Shinde extinguish tree fire) केला. पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ हा वणवा लागला होता. सयाजी शिंदे वणव्यात झाडांना लागलेली आग विझवतानाचा व्हिडीओही व्हायरल (Sayaji Shinde extinguish tree fire) झाला आहे.

सयाजी शिंदे एका ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना त्यांना कात्रज बोगद्याजवळ हा वणवा दिसला. त्यांनी तातडीने त्यांच्या सहकाऱ्यांसह हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

एकिकडे सयाजी शिंदे राज्यात वृक्ष रोपणाचे कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवडीचे संदेश देत आहेत. तर दुसरीकडे झाडांना वाचवण्यासाठी थेट वणव्यात उतरुन त्यांनी इतर झाडे जळण्यापासून वाचवली.

सयाजी शिंदे यांना दीड तासांनी वणवा विझवण्यात यश आले. त्यासोबत त्यांनी उद्या होळी आहे, होळीनिमित्त झाडांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहनही शिंदेनी केले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी देशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. या संमेलनात सयाजी शिंदेनीही उपस्थितांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI