AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले आयुष्यात मी कधीही…

मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं सांगत राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले आयुष्यात मी कधीही...
aditya thackeray and disha salianImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 6:00 PM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : राज्यात सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आली असून आता सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी सीबीआयला जबाब दिला असून आपल्या जबाबात माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत. तसेच माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोपही त्यांनी आपल्या जबाबात केलाय. दरम्यान, या जबाबावरून सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. परंतु गुन्हा दाखल करताना कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. हा गुन्हा दाखल होताच शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. दरम्यान आता याच आरोपांवर खुद्द आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. मी आयुष्यात कधीही दिशा सालियान यांना भेटलेलो नाही. मी त्यांना ओळखतही नाही, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलंय.

दिशा सालियान यांना कधीच भेटलो नाही

मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं सांगत राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या

तसेच, कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं सततचं खोटं कॅम्पेन राबवने दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय.

तर तो तुमचा भ्रम आहे

परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे, असा इशारा देत सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा