AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटातून फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता, आदित्य ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, काही वेगळी..

Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. 6 खासदारांनी मोठी बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिला. यावर आदित्य ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गटातून फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता, आदित्य ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, काही वेगळी..
Aaditya Thackeray
| Updated on: Jul 19, 2026 | 9:46 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. हा ठाकरे गटाला मोठा धक्का होता. या खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्रही दिले. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भूकंप आला. ज्यानंतर ठाकरे गटाने पक्षाचे व्हिप जारी करत बैठकीला उपस्थित राहण्याचे सर्व खासदारांना आदेश दिले. मात्र, तरीही हे खासदार बैठकीला उपस्थित राहिली नाहीत. मात्र, खासदारांनी बंडखोरी करून काही दिवस झाले तरीही बंडखोर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मान्यता मिळाली नव्हती. काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

थेट या गटाला मान्यता मिळाली. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदार संघात थेट सभा घेतल्या आणि यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मुंबईमध्ये परतताच पुन्हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. सचिन आहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही अन्याय सहन करत आहोत. सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले ते आज संपूर्ण देशासोबत घडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला मोठी घरघर लागली आहे. मोठी बंडखोरी त्यांच्या पक्षात होत आहे. खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुध, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचाैरे यांनी शिवसेना ठाकरे गटातून थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता लोकसभा अध्यक्षांकडूनही मान्यता मिळाली आहे. अजूनही शिंदेंकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जात आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!