AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!

ज्यांना लोक निवडून संसदेत पाठवतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात काम व्हावे, अशी त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. जेवढे सहा खासदार आमच्याकडे आले आहेत, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!
eknath shinde and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 8:10 PM
Share

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर ठाकरे यांच्या पक्षाला जबर धक्का बसला. पक्षामध्ये पुन्हा नवचेतना निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. असे असतानाच आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने लोकसभा सचिवालयाने तसे पत्रक काढले आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेप्रती असलेली जबाबदारी…

आम्ही कोणताही पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करतो. त्यामुळेच आमच्याकडे जे सहा खासदार आले, त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते आमच्याकडे आले आहेत. आमची त्यांना पूर्ण साथ असेल. त्यांच्या मतदारसंघात चांगले विकासकाम होईल. त्यांना चांगला विकासनिधी मिळेल, असे आश्वास त्यांनी दिले.

वैयक्तिक स्वार्थासाठी ते आमच्याकडे आलेले नाहीत

तसेच, ज्यांना लोक निवडून संसदेत पाठवतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात काम व्हावे, अशी त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. जेवढे सहा खासदार आमच्याकडे आले आहेत, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला नाही. जे आमच्यावर आरोप करतात, त्यांना हे खोटे वाटेल. वैयक्तिक स्वार्थासाठी ते आमच्याकडे आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या सहा खासदारांना आम्ही निधी देणार आहोत. त्यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्या खासदारांची भेट करून दिली, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. पक्षांतर केलं की पैसे घेतले, असा आरोप केला जातो. एखादा नेता जेव्हा त्यांच्यासोबत असतो, तोपर्यंत तो चांगला असोत. पक्षांतरानंतर लगेच संंबंधित नेता वाईट होते. लोक आपल्याला का सोडून जात आहेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा