AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!

राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदाराच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाला मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!
eknath shinde and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 7:33 PM
Share

UBT 6 MP Merger In Eknath Shinde Shivsena : ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले जात होते. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षाने कायदेशीर पावलं टाकायला सुरुवात केली होती. काहीही झालं तरी बंडखोरी केलेल्या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी माहिती समोर येत आहे. बंडखोर खासदारांच्या गटाचे एकनाथ शिंदे  यांच्या पक्षातील विलिनीकरणास मंजुरी देण्यात आलेली आहे.

ठाकरे गटाने दिले होते पत्र

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लोकसभा सचिवालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोर खासदारांनी ठाकरे गटापासून फारकत घेत वेगळा गट स्थापन केला होता. तसे पत्रही या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन आमच्या पक्षाने कोणामध्येही विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, अशा आशयाचे पत्र दिले होते. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू जाणून घ्यावी, अशी विनंतही ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी ही माहिती समोर आली आहे.

लोकसभा सचिवालयाने नेमका काय निर्णय घेतला?

लोकसभा सचिवालयाने बंडखोर 6 खासदारांच्या वेगळ्या गटाला शिंदे गटातील विलिनीकरणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता बंडखोर सहा खासदार हे आता शिंदे यांच्या पक्षाचाच भाग असतील. शिंदे गटाचे लोकसभेतील बळदेखील वाढले आहे. ठाकरे गटाच्या बंडखोरीनंतर आता विलिनीकरणाचे अधिकृत परिपत्रक लोकसभा सचिवालयाने काढले आहे.

आता नेमकं काय होणार?

दरम्यान, आता जबर धक्का बसल्यानंतंर ठाकरे गट नेमकं काय करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काहीही झालं तरी आम्ही सोडणार नाही. पुढचा कायदेशीर लढा आम्ही लढू असे ठाकरे यांचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शिंदे गटावरही टीका केली आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले