AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अखेर आता या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
nagesh patil ashtikarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 8:08 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली होती. या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला होता. परंतु अजूनही या बंडखोर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मान्यता मिळाली नव्हती. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता आमचे तेरा खासदार झाले आहेत, निश्चित आमची ताकद वाढणार आहे, आता आम्हाला या निकालाने जनतेच्या कामासाठी उभारी मिळाली, शंभर टक्के उभारी मिळेल असं यावेळी आष्टीकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली 

शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते, परंतु  शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची राज्यात ताकद वाढली, या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे एकूण 7 खासदार होते, परंतु या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा 13 वर पोहोचला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार राहीले आहेत. राज्यात आता महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार झाले आहेत. खासदाारांच्या संख्येत शिवेसना शिंदे गटाने भाजपला देखील मागे टाकलं आहे. त्यानंतर आता या बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत परवानगी दिल्यामुळे या खासदारांची मोठी चिता मिटली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...