AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांची नितीन गडकरींवर टीका, हा देशातील लोकांचा अपमान

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. नितीन गडकरी यांनी देशातील लोकांचा अपमान केल्याचं ते म्हणालेत. आदित्य ठाकरे यांनी म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही झालेली नाही. गडकरी सांगतात इतके पूल बांधले पण मग या महामार्गाचं काम का होत नाही.

आदित्य ठाकरे यांची नितीन गडकरींवर टीका, हा देशातील लोकांचा अपमान
| Updated on: Sep 06, 2024 | 3:47 PM
Share

टीव्ही ९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात बोलत असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा कारभार गुजरातमधून होतो अशी टीका त्यांनी केलीये. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केलीये. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अनेक वर्षापासून आम्ही फिरत आहोत. मी राजकारणात आलो तेव्हा मोखाडा, जव्हारमध्ये दुष्काळ होता. तेव्हाही गेलो होतो. अतिवृष्टी आणि दुष्काळ यावेळी मी नेहमी गेलो आहे. मी आणि माझ्या पक्षाचे नेते जात असतात. दोन तीन दौरे गाजले. कारण भाजपच्या लोकांनी हंगामा केला.’

‘अवकाळी सरकार डोक्यावर बसले आहे. ते जमिनीवर आहे का. त्यांचे पाय जमीनीवर आहे का. काल बदलापूरला गोळीबार झाला. दहा बारा दिवसापूर्वी बलात्काराचा गुन्हा घडला. पत्रकाराला शिंदे गटाचा नेता वामन म्हात्रे अर्वाच्य भाषेत बोलला. पण उलट पत्रकारावरच गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुतळा पडला.’

‘महाराष्ट्राचा कारभार गुजरातमधून चालतो. त्यांच्यात कोण इशारा देतो. कोण डोळा मारतो. हे समजत नाही. आमच्यावेळी भाजपचं सरकार केंद्रात होतं. आताही आहे. भाजपने राज्यात साडे आठ वर्ष राज्य केलं. केंद्रात १० वर्ष राज्य केलं. हे होऊनही महाराष्ट्राची अवस्था काय आहे. गडकरीं म्हणतात एवढे पूल रस्ते बांधले. मुंबई गोवा रस्ता पाहा. कुणाचा कंत्राटदार मित्र आहे. मुंबई नाशिक हायवेची अवस्था तीच आहे. जगात काही फुकट असेल तर भारतीय माणूस पुढे असतो असं गडकरी म्हणतात. हा देशातील लोकांचा अपमान आहे.’ असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

‘क्रिकेटमध्ये राजकारण कोणी आलं. बीसीसीआयचे सेक्रेटरी होते. आम्ही राजकीय लोकं समाजात जे काही चाललतं तो आाज बुलंद करतो. आम्ही प्रश्न उपस्थित केले तर त्याला राजकीय म्हणतात. लोकांना वाचवण्यासाठी आम्ही कोविडच्या काळात निर्बंध लावले. पण भाजपने ते राजकारण केलं. कोविडच्या काळात राजकारण करणारा एकमेव पक्ष भाजप होता. अगदी मंदिरासमोरही त्यांनी राजकारण केलं.’ असं ते यावेळी म्हणाले.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.