AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती, मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या प्रशासक नियुक्तीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हे वाद गोकुळ दूध संघापर्यंतच मर्यादित राहतात की त्याचे पडसाद जिल्ह्यातील पुढील राजकारणावर देखील पडतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती, मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का
administrator has been appointed to 'Gokul Dudh Sangha'
| Edited By: | Updated on: May 05, 2026 | 5:58 PM
Share

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. सातारचे उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक समितीने कार्यभार देखील स्वीकारला आहे. गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांना निमित्ताने मोठा धक्का बसला आहे. संघावर प्रशासक नियुक्ती वरून कोल्हापुरात महायुतीमध्ये राजकीय ठिणगी पडली असून याचे दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत काल ४ मे रोजी संपली आहे. मुदत संपताच या दूध संघावर प्रशासक समितीची नेमणूक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक या प्रशासक समितीचे अध्यक्ष असून अन्य चार सदस्य देखील या समितीमध्ये आहेत. गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होते.या संदर्भात दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. भाजपने या सर्वांनाच धक्का देत गोकुळवर प्रशासक नेमल्याने महायुतीला धक्का बसला आहे.

गोकुळ दूध संघाच्या या प्रशासक नियुक्तीवरून गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. चंदगडचे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी तर थेट मंत्री मुश्रीफ यांच्यावर गोकुळमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. नियमबाह्यपणे सभासद संस्था वाढवल्याचा आरोप सुद्धा शिवाजी पाटील यांनी केला आहे. गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त करावा यासाठी आमदार शिवाजी पाटील आग्रही होते. दूध संघावर प्रशासक नियुक्त होताच आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. जर दूध संघात गैरकारभार केला नसेल तर मंत्री मुश्रीफ प्रशासकांना का घाबरत आहेत असा सवाल करीत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर गोकुळमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप तर केला आहेच शिवाय येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आपल्यासोबत नकोत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या आरोपांवर फारसं प्रत्युत्तर देणे सध्या तरी टाळलं असून गोकुळ निवडणुकीच्या निकालाचा गुलाल लावूनच आता उत्तर देऊ असं म्हणत गोकुळ त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल आहे.

महायुतीमध्ये पडली वादाची ठिणगी

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून गोकुळ दूध संघावरून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना शिंदे गटाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे भाजप समर्थक मात्र आमदार शिवाजी पाटील यांची साथ देत आहेत. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची अदृश्य शक्ती देखील शिवाजी पाटील यांच्यासोबत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे . त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या प्रशासक नियुक्तीवरून शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी स्थिती निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये पडलेली ही वादाची ठिणगी गोकुळ दूध संघापर्यंतच मर्यादित राहते की त्याचे पडसाद जिल्ह्यातील पुढील राजकारणावर देखील होतात हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?