कोरोनावरील उपचार आणखी स्वस्त, औषधांवरील जीएसटीमध्ये कपात, अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

| Updated on: Jun 12, 2021 | 10:18 PM

कोरोनावरील औषधे तसेच इतर सामग्री यांच्यावरी जीएसटी कमी करावा अशी मागणी राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केली होती. यामध्ये उपमुख्यंत्री अजित पवार यांचादेखील समावेश होता. या मंत्रीगटाने शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनावरील उपचार आणखी स्वस्त, औषधांवरील जीएसटीमध्ये कपात, अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश
Follow us on

मुंबई : कोरोना उपचारासाठीची औषधे, उपकरणे आदींवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार कोरोना उपचाराशी संबंधित सर्व औषधं तसेच इतर बहुतांश सामग्री यांच्यावरील कर हा 5 टक्क्यांनी कमी केला आहे. कोरोनावरील औषधांवर आकारण्यात येणारा जीएसटी कमी करावा अशी मागणी राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केली होती. यामध्ये उपमुख्यंत्री अजित पवार यांचादेखील समावेश होता. या मंत्रीगटाने शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. (after demand by Ajit Pawar and central level ministers group central government reduced GST on Corona medicine)

अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

कोरोनावरील औषधे व वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांनी केली होती. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केंद्राकडे शिफारस केली होती. त्यानंतर आज (12 जून) झालेल्या 44 व्या जीएसटी परिषदेत या शिफारशी मान्य करण्यात आल्या. राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचासुद्धा समावेश होता. या शिफारशी मान्य झाल्यामुळे आता ऑक्सिजन तसेच संबंधित सामग्रीवर 12 टक्क्यांऐवजी आता 5 टक्के जीएसटी आकारला जाईल. तसेच कोविडशी संबंधित बहुतांश सामग्रीवरील कर 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता कोरोनावरील उपचार आणखी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर औषधांवरील जीएसटी कमी करण्यासाठी अजित पवार यांनी मोठे प्रयत्न केले असून अजित पवार तसेच मंत्रीगटातील इतर नेत्यांच्या प्रयत्नांचेच हे यश असल्याचे म्हटले जात आहे.

जीएसटी परिषदेत केंद्र सरकारने कोणते निर्णय घेतले ?

जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारी 5 टक्के जीएसटी कायम राहणार आहे. येत्या 30 सप्टेंबर 2021पर्यंत जीएसटी कपातीचा निर्णया लागू राहणार आहे.

अधिसूचना 13 जून रोजी काढणार

रुग्णवाहिकेवरील जीएसटी दर कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे. सध्या रुग्णवाहिकेवर 28 टक्के जीएसटी आकारला जातो. कोरोनाशी संबंधित ज्या साहित्यांवर सूट देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना उद्या जारी करण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही कपात लागू राहील. त्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होणार आहे.

इतर बातम्या :

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीमध्ये जिल्ह्यात दिवसभरात 1010 नवे कोरोना रुग्ण, 24 रुग्णांचा मृत्यू

(after demand by Ajit Pawar and central level ministers group central government reduced GST on Corona medicine)