सर्वात मोठी बातमी! नीटनंतर आता आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला, ठाण्यात खळबळ

ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! नीटनंतर आता आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला, ठाण्यात खळबळ
Paper Leak
Image Credit source: Google
| Updated on: Jun 27, 2026 | 1:20 PM

ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आगामी काळात या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

ठाण्यात टीईटीचा पेपर फुटला

उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीचा पेपर घेण्यात येणार होता,मात्र आता पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता अधिकृत परिपत्रक जारी करून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.

पेपरफुटीत सरकारचा सहभाग – दानवे

या पेपरफुटीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले की, ‘या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे. हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे. ‘

Follow Us