AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथून कसाब आला तोच भाग…सागरी सुरक्षेचं धक्कादायक वास्तव समोर! पालघरचा 110 किमी किनारा फक्त…

मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मुंबईत दाखल होण्यासाठी वापरलेला पालघर जिल्ह्याच्या लगतचा समुद्री भागदेखील असुरक्षित असल्याचा पुन्हा एकदा उघड झालाय.

जिथून कसाब आला तोच भाग...सागरी सुरक्षेचं धक्कादायक वास्तव समोर! पालघरचा 110 किमी किनारा फक्त...
palghar coastal security
| Updated on: Apr 24, 2025 | 9:19 PM
Share

Palghar Coastal Security :  जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यातच मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मुंबईत दाखल होण्यासाठी वापरलेला पालघर जिल्ह्याच्या लगतचा समुद्री भागदेखील असुरक्षित असल्याचा पुन्हा एकदा उघड झालाय. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी पालघर पोलीस प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आलेल्या स्पीड बोट धुळखात पडल्याचे समोर आले आहे.

110 किलोमिटरचा समुद्रकिनारा पण गस्तीसाठी फक्त एक बोट

एकूण 4 पैकी 3 बोटी नादुरुस्त आहेत. एकाच बोटीवर तब्बल 110 किलोमीटरच्या सागरी सुरक्षेचा भार असल्याचा पाहायला मिळतंय. सागरी सुरक्षा लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जानेवारी महिन्यात राज्य सरकारने कोकणपरीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे पालघर जिल्ह्याला आणखीन चार स्पीड बोटची आवश्यकता असल्याची मागणी केली होती. मात्र या पत्राकडेदेखील वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

भारताची सागरी सुरक्षा रामभरोसे

सागरी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने काढलेले टेंडर मागील एक महिन्यांपासून संपलं असल्याने नवीन चार खासगी गस्ती बोटींचं टेंडर काढण्यात यावं अशी मागणी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तीन महिन्यापूर्वी केली होती. सध्या येथील सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचा पाहायला मिळते आहे. त्यामुळे लवकरात लवकरच गस्त घालणाऱ्या स्पीड बोट्स पालघर जिल्ह्याला पुरवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कडक निर्णय घेतल्यामुळे आता पिकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून भारताविरोधात काही निर्णय घेतले आहेत. भारताने आतापर्यंत कधीही न घेतलेला सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानचे भारतातील लष्करविषयक सल्लागार यांना भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले. पाकिस्तानमध्ये असलेल्या उच्चायुक्तालयांची संख्याही कमी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यात द्विपक्षीय व्यापारबंदी, वाघा बॉर्डर बंद करणे, भारतीय नागरिकांना पाकिस्तान सोडून जाण्याचा आदेश देणे अशा काही निर्णयांचा समावेश आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमंक काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?