AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?

राज्यात अशोक खरात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे.

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?
rupali chakankar resignationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 3:51 PM
Share

Ashok Kharat : भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भविष्यवेत्ता असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसे साधारण 100 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यानंतर या अशोक खरातचे हादरवून टाकणारे एक-एक कारमाने समोर येत आहेत. त्याच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर हे सगळे प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. चाकणकर या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांत खरातसोबत दिसून आल्याने ही त्यांच्यावर टीका झाली आणि आता त्यांनमी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामे राहिल्यानंतर आता या पदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार? याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी दोन नावंं समोर आली आहेत.

महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच

रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्या आहेत. त्यामुळे आता या पदावर नव्याने कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाचे अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार का? असेही विचारले जात होते. परंतु मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चाणकरांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या प्रमुखपदाची खुर्ची राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. त्यासाठी दोन महिला नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही नावांवर विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

ती दोन नावे कोणती आहेत?

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील वैशाली नागवडे यांच्या नावाचा विचार केला जातोय. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील प्रतिशा शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. या दोन्ही नावांपैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते. परंतु या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी