AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Scandal : 250 अश्लील व्हिडिओ, योनी पूजन… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भयानक, किळसवाणे प्रकार; महिला नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

महिलेवर अत्याचाराच्या आरोपाखाली भोंदू बाबा अशोक खरातच्या अटकेनंतर गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी आक्रमक झाल्यात. खरातचे 200-250 अश्लील व्हिडिओ असून त्यात मोठे नेतेही गुंतल्याचे संकेत त्यांनी दिले. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या भूमिकेवरही तिवारींनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

Ashok Kharat Scandal : 250 अश्लील व्हिडिओ, योनी पूजन... भोंदूबाबा खरातच्या दरबारात भयानक, किळसवाणे प्रकार; महिला नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ
अशोख खरात प्रकरणात खळबळजनक खुलासेImage Credit source: TV9
| Updated on: Mar 21, 2026 | 1:54 PM
Share

कथित कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या अटकेनंतर आता खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होताना दिसत आहे. त्याच्या कृत्यांबद्दल रोज नवनवी माहिती समोर येत असून तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशी काही कृत्य त्याने केली आहेत. याप्रकरणावरून गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावा काल त्यांनी केला होता, तर आज टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी याच प्रकरणात आणखी मोठे खुलासे करत काही हादरवणारे गौप्यस्फोटही केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर टीकेची राळ उठली. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही चाकणकरांवर टीकास्त्र सोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, अखेर काल रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवारांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. या संपूर्ण प्रकरणावरही संगीता तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शब्दांतही मांडता येणार  नाही असे भयानक प्रकार

अशोक खरातचे कारनामे भयानक आहेत. याप्रकरणाचा तपास शेवटपर्यंत जाईल की नाही याबद्दल मला साशंकता आहे कारण यामध्ये अनेक मोठमोठी नावं, खूप मोठे नेतेमंडळी, नामांकित बिझनेसमनही त्यात आहेत. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, त्या खरातचे फक्त 58 क्लिप्स किंवा व्हिडीओ नाहीयेत, तर त्या क्लिप्सचा आकडा 200-250 च्या वर आहे. त्यामध्ये ब्ल्यू फिल्म्स आहेत, बऱ्याच घाण घाण गोष्टी त्यामध्ये आहेत. म्हणजे योनी पूजनाचे व्हिडीओही आहेत, शब्दातंही मांडता येणार नाही एवढा भयानक सगळा प्रकार आहे असा मोठा गौप्यस्फोट करत तिवारी यांनी खळबळ उडवली.

पक्षाने चाकणकरांची हकालपट्टी केली पाहिजे

असं सगळं असताना रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचा राजीनामा दिला आहे, आणि तो राजीनामा देतानाही त्यात माज होता माज. त्यांना काही गिल्ट, किंवा चुकीच्या माणसाला साथ दिली याचं वाईट वाटतंय असं काही दिसलं नाही, असं तिवारी म्हणाल्या.   चाकणकर यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला ते पण अगदी निडरपणे, म्हणजे तो माज आहे.  महाराष्ट्रातल्या महिलांशी, त्यांच्या संसाराशी , शरीराशी आपण खेळलोय, त्यांना संपवलंय याचं कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर गिल्ट नव्हतं.  मी तर म्हणते पक्षाने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका तिवारी यांनी मांडली.

त्यांचं प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतलं पाहिजे, मी सुनेत्रा वहिनींना विनंती करते की त्यांची हकालपट्टी करा. पक्षाचं नाव खूप खराब होतंय, आपल्याला संघटना बांधायची असेल तर असं नासकं माणूस आपल्याबरोबर नको, असंही संगीता तिवारी म्हणाल्या.

अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयावर धडक मोर्चा काढणार

अत्याचारी  खरातसोबत तिने (चाकणकर) हे जे कांड केलं आहे, खरात फाईलमध्ये ही जी पार्टनर आहे, तिची चौकशी व्हावी, तिच्यावर कायदेशीरपणे गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी अशी मागणी तिवारी यांनी केली. आणि जरं असं झालं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसवर धडक मोर्चा घेऊन जाऊ, असा इशाराही संगीता तिवारी यांनी दिला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी